वाघोली : प्रतिनिधी
रक्षाबंधन व तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त वाघोली येथील वाघेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना अष्टविनायक मित्र मंडळाच्या वतीने तीन हजार तीनशे तेहतीस तुळशी रोपांचे वाटप करण्यात आले.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वाघोली येथील अष्टविनायक मित्रमंडळाच्या वतीने रक्षाबंधन व तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त वाघेश्वर मंदिरात भाविकांना ३ हजार ३३३ तुळशी रोपांचे वाटप करण्यात आले. भारतीय संस्कृती व परंपरांमध्ये तुळशीला अनन्य साधारण असे महत्त्व आहे.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष विक्रम वाघमारे, रमाबाई महिला मंडळाच्या संस्थापिका लक्ष्मीताई वाघमारे, माजी सरपंच जयश्रीताई सातव पाटील, माजी जि. प. सदस्य अर्चना कटके, वाघेश्वर विकास प्रतिष्ठाणचे अध्यक्ष राजेंद्र सातव पाटील, उपाध्यक्ष रामदास दाभाडे आदी उपस्थित होते.

तुळशीला अनन्य साधारण महत्त्व
तुळस हे दिसायला छोटे रोपटे असले, तरी भारतीय संस्कृती व परंपरांमध्ये तुळशीला अनन्य साधारण असे महत्त्व आहे. तुळस विष्णूप्रिया किंवा हरिप्रिया असेही संबोधले जाते. आपल्याला एखादी वस्तू देवाला अर्पण करावयाची असेल तर ती तुळशीच्या मुळापाशी अर्पण करतात. म्हणजे ती वस्तू इष्ट देवतेकडे पोहचते, अशी लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते. तुळस अर्पण केल्याशिवाय केलेली विष्णूची पूजा व्यर्थ ठरते, असे पद्मपुराण सांगते. तुळशीची मंजिरी सर्व देवांची प्रतिनिधी मानली आहे. तुळस आरोग्य दृष्ट्याही अतिशय महत्त्वाची मानली गेली आहे.

तुळशीचे विविध गुणधर्म आयुर्वेदात सांगितले गेले आहे. समुद्र मंथनातून जेव्हा अमृत निघाले, तेंव्हा त्याचे थेंब जमिनीवर पडले, त्यापासून तुळस या वनस्पतीचा जन्म झाला असे मानले जाते. भारतीय संस्कृती व परंपरांमध्ये तुळशीला अनन्य साधारण असे महत्त्व आहे.
माजी सरपंच शिवदास उबाळे, अनंत कटके, माधवी वाघमारे, सागर दानी, पंकज काळे, शिवाजी सातव, प्रमाद काळे, सागर म्हस्के, तरण सिंग, गजानन पांचाळ, आनंद जोशी, अनिकेत वाघमारे, यश वाघमारे, वृषभ कोठारी, मयुर, निखिल, आकाश, प्रतिक वाघमारे आदींसह विक्रम वाघमारे मित्र परिवार, ओजस हॉस्पीटॅलिटी आणि अष्टविनायक मित्र मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.





