- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणआमदार अशोक पवार यांना महिलांनी बांधली महिला सुरक्षेची राखी

आमदार अशोक पवार यांना महिलांनी बांधली महिला सुरक्षेची राखी

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
राखी पोर्णीमेनिमित्त शिरुर शहरातील राष्ट्रवादी महिला पदाधिकारी यांच्या वतिने आमदार ॲड. अशोक पवार यांना राखी बांधुन एक अनोखा उपक्रम साजरा केला. यावेळी महिला सुरक्षा राखी कार्यसम्राट आमदार अशोक पवार यांना बांधून रक्षाबंधन साजरे केले.


रक्षाबंधन हा सण सर्व ठिकाणी साजरा केला जातो. बहीण भावाच्या पवित्र नात्याचा हा सण आहे. परंतु सध्या महिलांवर अनेक अत्याचार होत आहे अनेक अडचणी सामोरे जावे लागत आहे. म्हणून शिरूर हवेलीचे कार्यसम्राट आमदार अशोक पवार यांना भाऊ मानून त्यांचा कडे ओवाळणी म्हणून महिला सुरक्षेची मागणी महिलांच्या वतीने करण्यात आली. या राखी मध्ये महिला सुरक्षा, महागाई निर्मूलन, महिला सबलीकरण, युवकांचे भविष्य, शेतीमालाला हमीभाव, शिक्षण आणि आरोग्य असे त्यात लिहिले होते. एक आगळी वेगळी राखी बांधून हा सण साजरा केला.


यावेळी शिरूर हवेलीचे कार्यसम्राट आमदार अशोक पवार यांनी सर्व बहिणीची सुरक्षा जबाबदारी घेईल असे सांगितले. लोकप्रतिनिधी म्हणुन आमचे कर्तव्य आहे कि त्यांचे रक्षण करणे महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील सर्व महिलांना शासनाने सरक्षण देणे गरजेचे असल्याचे पवार यांनी या वेळी सांगितले. महिलांवर अन्याय करणाऱ्याला कठोर शासन झाले पाहीजे असे पवार म्हणाले.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090
मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page