गजानन गव्हाणे पाटील
महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त भारत सरकार सूक्ष्म,लघु, एवंम मध्यम उदयम मंत्रालय या विभागात सह्याद्रीरत्न महाराष्ट्र राज्य या संस्थे मार्फत समाज, संस्कृती आणि त्यांचे संवर्धन, व लोकशाही विचारांना एकत्र करणारा आणि जगणाला ध्येय बनवणाऱ्या ऐतिहासिक गुणवत्तेचा सर्वश्रेष्ठ सन्मान सोहळया मध्ये शिरुर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगीचे सरपंच बापूसाहेब बबनराव काळे यांना सह्याद्रीरत्न पुरस्कार माजी आमदार तुकाराम सावंत, लेखक समुपदेशक डॉ. संतोष मचाले, प्रसिद्ध उद्योजक नितीन धवणे, अभिनेत्री आर्या घारे, संस्थेचे अध्यक्ष डॉ. दिपक जाधव या मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आला.

यावेळी सरपंच बापूसाहेब यांनी सरपंच झाल्या नंतर पहिल्याच दिवसापासून गावच्या विकासासाठी जे अहोरात्र झटत आहेत, गावातील ग्रामस्थांची सेवा हिच ईश्वर सेवा असे मानून सरपंच बापूसाहेब काळे हे जनतेच्या सेवेला भुकेलेले एक आदर्श सरपंच आम्हाला प्रेरणा देणारे वाटतात आणि म्हणून सरपंच बापूसाहेब बबनराव काळे यांना आम्ही सह्याद्रीरत्न पुरस्कार देतो आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे असे मत संस्थेचे अध्यक्ष डॉ. दिपक जाधव यांनी व्यक्त केले


पुरस्कार स्विकारल्या नंतर या पुरस्काराने नक्कीच माझ्या गावाला आनंद झाला आहे परंतु हा पुरस्कार ज्यांनी मला घडवलं असे माझे आई वडील, माझे गुरुजन वर्ग, माझा असणारा महाराष्ट्रातील मित्र परिवार, माझ्यावर प्रेम करणारा सर्व माझा चाहता वर्ग आणि माझ्या गावातील माझे सर्व ग्रामस्थ तसेच ज्यांनी मला योग्य न्याय दिला असे माझे पत्रकार बांधव यांच्या आशिर्वादामुळे हा पुरस्कार मला मिळाला असून हा माझा एकट्याचा पुरस्कार नसून आपल्या सर्वांचा आहे त्यामुळे हा पुरस्कार आपल्या सर्वांना मी माझ्या अंतःकरणा पासून समर्पित करत आहे.असाच कायम मला आपला आशिर्वाद मिळत रहावा अशी प्रार्थना यावेळी सरपंच बापूसाहेब काळे यांनी व्यक्त केली.





