वाघोली : प्रतिनीधी
मनसेचा राजीनामा दिलेले वाघोलीतील उपविभाग अध्यक्ष प्रकाश जमधडे यांनी नुकताच शिव स्वराज्य यात्रे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते हवेली तालुका उपाध्यक्ष पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली.
त्यांनी या अगोदर वाघोलीतील विविध सार्वजनिक प्रश्नांवर आंदोलने केली होती तर त्यांनी नुकतीच शिरूर लोकसभा निवडणूक लढवली होती.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार, युवक प्रदेश अध्यक्ष महेबूब शेख, जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, हवेली तालुका अध्यक्ष संदीप गोते आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या सोबत मनसे च्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.

शिरूर – हवेली विधानसभा मतदार संघात ऐन विधानसभेच्या तोंडावर झालेल्या प्रवेशामुळे पक्षाची या भागात ताकद वाढली आहे त्यामुळे याचा नक्कीच फायदा पक्षाला होईल अशी चर्चा चालू आहे.

शरदचंद्र पवार यांनी अनेक कार्यकर्त्यांचे नेते घडवले आहेत आणि त्यांची काम करण्याच्या पद्धतीमुळे ऊर्जा मिळते. येणाऱ्या काळात पक्ष वाढी साठी योगदान देणार असे प्रकाश जमधडे यांनी नियुक्तींनंतर माध्यमांशी बोलतांना सांगितले.





