गजानन गव्हाणे पाटील
जिल्हा परिषदेच्या शाळेने अनेक विद्यार्थ्यांचे मौल्यवान रत्न तयार केली असून ती विविध उच्च दर्जाच्या पदावर कार्यरत आहे, हे काम आपल्या तालुक्यातील गुणी शिक्षकांनी केले असून त्यांचा संघटनेच्या मार्फत यथोचित सन्मान होत आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे ,असे प्रतिपादन पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन खात्याच्या माजी सभापती सुजाता अशोकराव पवार यांनी नुकतेच शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने गुणवंत शिक्षकांच्या गुणगौरव कार्यक्रमात प्रतिपादन केले.
तळेगाव ढमढेरे. ता. शिरुर येथील शिक्षक भवन येथे शिरुर तालुक्यातील शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षा मार्गदर्शक शिक्षक, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा व गुणवंत शिक्षक सत्कार कार्यक्रमात बोलत होत्या.

शिरुर प्राथमिक शिक्षक संघाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचे नेते संभाजीराव थोरात होते. यावेळी ७५ गुणवंत शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिरूर तालुक्याचे माजी आमदार पोपटराव गावडे व माजी आमदार सूर्यकांत काका पलांडे हे होते. तसेच शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य रमाकांत काठमोरे, शिक्षक नेते रावसाहेब रोहोकले हे होते.

राज्यामध्ये शिरुर तालुक्याने प्रथम क्रमांक पटकविला आहे. ही बाब तालुक्याच्या आम जनतेच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे.गुणवत्तेबाबत तालुक्याचा हा आलेख चढता राहण्यासाठी सर्व शिक्षकांना शुभेच्छा देतो असे माजी आमदार पोपटराव गावडे म्हणाले
शिष्यवृत्ती परीक्षेत शिरुर तालुक्यातील शिक्षकांनी यशाची परंपरा अबाधित ठेवण्याचे काम केले आहे. त्यांचे हे कार्य कौतुकास्पद आहे. जिल्हा परिषद शाळेतून अधिकाधिक दर्जेदार विद्यार्थी घडत आहेत. असे माजी आमदार सूर्यकांतकाका पलांडे म्हणाले.
शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षा या विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षेचा पाया आहे. लहान वयात मुलांना स्पर्धा परीक्षेबाबत आवड निर्माण झाली आहे. या यशाचे सातत्य त्यांना टिकवावे लागेल. त्यासाठी शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन लाभले पाहिजे. असे शिक्षण सहसंचालक महाराष्ट्र राज्य रमाकांत काठमोरे यांनी म्हटले .

यावेळी खंडेराव ढोबळे, ज्ञानेश्वर पुंडे, बापूसाहेब लांडगे, शांताराम घोरपडे, बाळासाहेब घोडे, सुरेश सातपुते, सोमनाथ गायकवाड, सुरेश शिंदे, दादासाहेब खेसे, अविनाश चव्हाण, लहू शितोळे, जयवंत मोहिते, प्रवीण गायकवाड, प्रभाकर शेळके, कैलास गारगोटे, विश्वास साकोरे, विकास उचाळे, लहू गाजरे, सुनील शेळके, तानाजी वाघमारे, संतोष पळसकर, विनायक पवार, आबासाहेब जाधव, संदीप सोनवणे, संतोष गावडे, बबन म्हाळसकर, साधना शिंदे, नयना आरगडे, राहुल घोडे, उपेंद्र डुंबरे, सोपान शेलार, हिरामण ढोकले हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष शेवाळे , सूत्रसंचलन आप्पासाहेब रसाळ व गुणवंत शिक्षिका जयमाला मिडगुले तर आभार राजाराम सकट यांनी मानले.





