गजानन गव्हाणे पाटील
पुणे जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अंतर्गत दरेकरवाडी (ता.शिरूर) येथील मारुती दरेकर यांचे घर ते संजय जगताप यांच्या घरापर्यंतचा रस्ता (निधी १० लक्ष) व प्रताप भोसले यांच्या घरापासून ते स्मशान भूमी कडे जाणारा रस्ता (निधी १० लक्ष) सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याच्या कामाचा शुभारंभ शिरूर हवेली चे आमदार अशोक पवार यांच्या हस्ते संपन्न झाला.

यावेळी आमदार पवार यांनी गावाच्या विकासाला भविष्यात केव्हाही निधी कमी पडून देणार नाही. तसेच गावात भव्य दिव्य सभागृह बांधण्याचे आश्वासन दिले.


या प्रसंगी दरेकर वाडीचे सरपंच आशा नवनाथ दरेकर, उपसरपंच कमल देविदास दरेकर तसेच ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, आजी – माजी सरपंच, उपसरपंच, चेअरमन आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





