गजानन गव्हाणे पाटील
कोरेगाव भिमा (ता.शिरूर) येथील कन्येने आई वडिलांच्या कष्टाचे सोने करत राज्यातील आव्हानात्मक असणाऱ्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवत जलसंपदा विभाग समन्वय समिती गट ब व गट क सरळसेवा भरती २०२३ अंतर्गत जलसंपदा विभाग पुणे परिमंडळ, कालवा निरीक्षक पदी कु. आरती संतोष घावटे हिने यश मिळवल्याने तिच्यासह कुटुंबावर अभिनंदाचा वर्षाव करण्यात येत आहे.

कोरेगाव भिमा येथील शेतकरी कुटुंबातील पोलीस प्रशासनात सेवेस असणारे संतोष घावटे यांच्या सुकन्येने अनेक अडथळे, आव्हाने व अपयशावर मात परीक्षेत नेत्रदिपक यश मिळवत कोरेगाव भिमा येथील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या पिढीपुढे आदर्श ठेवला आहे.या यशाबद्दल तिचे व कुटुंबीयांचे मोठ्या प्रमाणात अभिनंदन करण्यात येत आहे


या यशाबद्दल कु.आरती घावटे यांचा सत्कार कोरेगाव भिमाचे सरपंच संदीप ढेरंगे, संचालक अशोक गव्हाणे, संचालक राजाराम ढेरंगे, माजी सरपंच विजय गव्हाणे, माजी सरपंच अमोल गव्हाणे, ग्रामपंचायत सदस्य शरद ढेरंगे, वंदना गव्हाणे, रेखा ढेरंगे, जयश्री गव्हाणे, माजी ग्रामपंचायत सदस्या अंजली ढेरंगे, सामाजिक कार्यकर्ते तिरसिंग नानगुडे, किरण नानगुडे, दिपक गव्हाणे, तानाजी ढेरंगे, प्रदीप खलसे, ओंकार घावटे यांनी केला.





