- Advertisement -spot_img
Homeशालेयशाळा समितीच्या अध्यक्षपदी विठ्ठल गायकवाड; उपाध्यक्षपदी कोमल गायकवाड

शाळा समितीच्या अध्यक्षपदी विठ्ठल गायकवाड; उपाध्यक्षपदी कोमल गायकवाड

- Advertisement -spot_img

लोणीकंद : प्रतिनीधी
कोलवडी-साष्टे, ता.हवेली येथील गायकवाड वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी विठ्ठल गायकवाड तर उपाध्यक्ष पदी कोमल गायकवाड यांची बिनविरोध निवड पार पडली.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गायकवाड वस्ती येथे पालक सभा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये सन २०२४ ते २०२६ साठी नवीन शाळा व्यवस्थापन समिती गठित करण्यात आली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य पदांच्या सर्वानुमते बिनविरोध निवडी जाहीर करण्यात आल्या.
यामध्ये समितीच्या अध्यक्षपदी विठ्ठल गायकवाड व उपाध्यक्षपदी कोमल गायकवाड तर सदस्यपदी संतोष मदने, नितीन गायकवाड, म्हस्कू गायकवाड, देवानंद शेंडगे, सुवर्णा गायकवाड, माधुरी गायकवाड, संध्या गायकवाड, आम्रपाली रोकडे, अमृता गायकवाड, ग्रां. पं. सदस्य रमेश मदने, शिक्षणतज्ञ स्वाती गायकवाड अशा नियुक्ती करण्यात आल्या.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

निवड झाल्याबद्दल सर्वांचा सत्कार कोलवडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच रमेश मदने यांच्या हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी शिवशक्ती विकास सोसायटीचे चेअरमन शरद गायकवाड, माजी सरपंच बबन गायकवाड, माजी चेअरमन कैलास गायकवाड, अजित गायकवाड, राजू गायकवाड, गणेश गायकवाड, लक्ष्मण गायकवाड आदी उपस्थित होते.
शाळेच्या अडीअडचणी सोडवणे,शाळेची प्रगती साधने,शाळेचा विकास साधण्यासाठी प्रयत्न करणे,विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ व प्रगतीकडे लक्ष देणे,आदी शाळे संदर्भात शाळा व्यवस्थापन समितीने एकत्रित येऊन कामे करणे, यासाठी शाळा व्यवस्थापन समितीने यापुढे लक्षपूर्वक कामे करणे गरजेचे आहे. नवनियुक्त अध्यक्ष,उपाध्यक्ष,सदस्यांचे आम्ही कोलवडी-साष्टे ग्रामपंचायतीच्या व ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करीत आहोत.
रमेश मदने,उपसरपंच- ग्रामपंचायत कोलवडी-साष्टे

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page