गजानन गव्हाणे पाटील
गेल्या तीस वर्षांपासून दिपअमावस्या निमित्ताने ग्रामदैवत श्री म्हसोबा महाराजांची पालखी म्हाळुंगी येथील भीमानदीतीरी म्हसोबा महाराजांना भीमास्नान घालण्यासाठी संजय लांडगे, केरबा चौधरी, शोभाताई भागवत, म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार काळुराम चव्हाण, बाळासाहेब चव्हाण, दत्तात्रय काळे, भाऊसाहेब काळे, बाळासाहेब काळे, काळु चव्हाण, मारुती केरू चव्हाण, सोपान चव्हाण, सुरेश आढाव, विष्णू धोत्रे, बाबुराव चौधरी,लक्ष्मण लांडगे,शंकर चव्हाण, बाळू चव्हाण,मारुती चव्हाण, शिवाजी शिर्के, छगन रणसिंग, शामराव शिंदे, शिवाजी नागवाडे, भगवान नागवडे, बाळासाहेब चव्हाण, राजाभाऊ पवार, भाऊसो चौधरी, सहादू चौधरी,प्रकाश शिर्के, प्रशांत धोत्रे,मेजर संभाजी चव्हाण,कैलास रणसिंग,देवाचे पुजारी महेश कारकूड आणि बंडू कारकूड यांच्या नेतृत्वाखाली जात असते.
यावर्षी सकाळी गावात म्हसोबा महाराजांची पूजा निमगाव म्हाळुंगी चे सरपंच बापूसाहेब काळे यांच्या हस्ते करून पालखीची सुरवात करण्यात आली.
या पालखी दरम्यान निमगाव म्हाळुंगी गावचे एक आगळे वेगळे वैशिष्ट्य या पालखीतून समाजाला पाहायला मिळते. गावात राहणाऱ्या बाराबलुतेदार समाजापैकी, पालखी गावातून बाहेर निघत असताना पालखीचा पहिला मान नाईक समाजाला देण्यात येतो, दुसरा मान वडार समाजाला देण्यात येतो तसेच तिसरा मान हरिजन समाजाला आणि चौथा मान मातंग समाजाला देण्यात येतो आणि नंतर चांभार, कुंभार, सुतार, माळी, कोळी, गोपाळ, धनगर, लोहार समाजाला देण्यात येतो.
श्री म्हसोबा महाराजांची पालखी म्हाळुंगी गावाला प्रस्थान करत असताना पालखीचे स्वागत निमगाव म्हाळुंगीचे सामाजिक कार्यकर्ते अनिल ढेरंगे, पारोडीचे माजी सरपंच दत्तात्रय शिवले, सोपानराव चौधरी, पारोडीचे सरपंच कमल प्रकाश शिवले, तुकाराम येळे, बाळासाहेब शिवले, हनुमंत शिवले, आनंदा साळुंके, यांनी पालखीचे स्वागत उत्साहात केले.

पालखी भीमानदीच्या तीरी पोहचल्यानंतर निमगाव म्हाळुंगी चे सरपंच बापूसाहेब काळे, पालखीचे प्रमुख संजय लांडगे यांच्यासह पालखीसोबत आलेल्या सर्व भक्तांच्या हस्ते देवाला नदीमध्ये दहीदुधाचा अभिषेक करून देवाला भीमास्नान घालण्यात आले व सरपंच बापूसाहेब काळे यांच्या शुभहस्ते व ग्रामस्थांच्या शुभहस्ते देवाची महाआरती करून पालखीचे निमगाव म्हाळुंगी गावाकडे प्रस्थान करण्यात आले.
सदर पालखीचे प्रास्ताविक केरबा चौधरी यांनी केले तर वरील सर्व पालखीला निमगाव म्हाळुंगी, पारोडी, म्हाळुंगी गावातील ग्रामस्थांनी मोठया प्रमाणावर सहभागी होऊन सहकार्य केले त्या बद्दल सर्वात शेवटी गावच्या वतीने सरपंच बापूसाहेब काळे यांनी सर्वांचे आभार मानले





