- Advertisement -spot_img
Homeक्राईमवाघोलीतील गणेश ज्वेलर्स फोडणारे सराईत जेरबंद

वाघोलीतील गणेश ज्वेलर्स फोडणारे सराईत जेरबंद

- Advertisement -spot_img

गुन्हे शाखा युनिट-६ ची धडाकेबाज कामगिरी;  एकूण ५ गुन्हे उघडकीस
वाघोली : प्रतिनीधी
वाघोली येथील गणेश ज्वेलर्स फोडणारे सराईत गुन्हेगार गुन्हे शाखा युनिट-६ च्या पथकाने वाघोली-भावडी रोडवरील भैरवनाथ मंदिराजवळ चोरीच्या वाहनांसह जेरबंद केले आहेत. त्यांचेकडून ६५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून लोणीकंद, येरवडा, देहू पोलीस ठाण्यातील एकूण ५ गुन्हे उघडकीस आले आहेत.
हंसराज उर्फ हंसु रनजितसिंग टाक (वय २० रा. तुळजाभवानी वसाहत, हडपसर, पुणे), सनिसिंग जितेंद्रसिंग जुनी (वय २२ रा. रामटेकडी, हडपसर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी (दि. २५जुलै) गुन्हे शाखा युनिट-६ चे पथक हद्दीमध्ये गुन्हे प्रतिबंधक गस्त करत असताना पोलीस नाईक नितीन मुंढे यांना वाघोली येथील घरफोडीतील आरोपी वाघोली ते भावडी रोडवर भैरवनाथ मंदिराजवळ मोकळया जागेत चोरीचे वाहनांसह थांबले असल्याची खात्रीशीर माहिती बातमीदारामार्फत मिळाली. युनिट-६ च्या पथकाने सदर ठिकाणी सापळा रचला. पोलीस आले असल्याचे समजताच दोघे संशयित पळून जावू लागले. परंतु युनिट-६ च्या पथकाने मोठ्या शिताफीने त्यांना ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता इको गाडीत येऊन इतर साथिदारांसह वाघोली येथील गणेश ज्वेलर्सचे शटर उचकटून घरफोडी केल्याची कबुली दिली.
हंसराज उर्फ हंसु रनजितसिंग टाक हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याचेवर यापुर्वी दरोडा, घरफोडी आदी एकुण २५ गंभीर गुन्हे दाखल आहेत.
आरोपींकडून दोन दुचाकी घरफोडी व एटीएम फोडीसाठी लागणारे साहित्य व हत्यारे असा एकुण ६५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. लोणीकंद, येरवडा, देहुरोड पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह-आयुक्त  रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे-२) सतीश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट-६ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, विठ्ठल खेडकर, रमेश मेमाणे, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, सचिन पवार, शेखर काटे, नितीन धाडगे, समीर पिलाने, बाळासाहेब तनपुरे, किर्ती मांदळे, प्रतिक्षा पानसरे व सुहास तांबेकर यांनी केली आहे.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page