- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीण" आपला आमदार - आपल्या गावी " मुक्कामी संकल्पनेचा आमदार अशोक पवारांचा...

” आपला आमदार – आपल्या गावी ” मुक्कामी संकल्पनेचा आमदार अशोक पवारांचा उपक्रम

- Advertisement -spot_img

श्री क्षेत्र तुळापूर येथून उपक्रमाला आज प्रारंभ
गजानन गव्हाणे पाटील
तुळापूर, ता. हवेली, जि.पुणे येथे शिरुर-हवेलीचे विद्यमान आमदार ॲड. अशोक पवार यांनी आपला आमदार आपल्या गावी मुक्कामी या संकल्पनेतून गावातील सर्व लाभार्थ्यांची माहिती, प्रलंबित कामे, प्रकरणे, कर्जमाफी, अतिवृष्टी याद्या आदी मतदार संघातील नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी बैठक आज १९ जुलै रोजीआयोजित करण्यात आली आहे.


शिरुर-हवेली मतदार संघात तुळापूर, फुलगांव व वढु खुर्द कार्यक्षेत्रा अंतर्गत आमदार आपल्या गावी या संकल्पनेतून गावातील सर्व लाभार्थ्यांची माहिती, प्रलंबित कामे, प्रकरणे, कर्जमाफी, अतिवृष्टी याद्या इत्यादी नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी, आयुक्त, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, आकुर्डी गट विकास अधिकारी, पंचायत समिती हवेली, पुणे, तहसिलदार, तालुका कृषि अधिकारी हवेली, तालुका आरोग्य अधिकारी हवेली, उपअभियंता बांधकाम पंचायत समिती हवेली, पशु वैद्यकीय अधिकारी पंचायत समिती हवेली, तालुका क्रिडा अधिकारी हवेली, उप अधिक्षक भुमिअभिलेख हवेली, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग (दक्षिण) हवेली पुणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस स्टेशन, वन परिमंडळ अधिकारी लोणीकाळभोर, उप उभियंता, महाराष्ट्र राज्य विदयुत पारेषण कंपनी व विदयुत महामंडळ लोणीकाळभोर, मंडल अधिकारी लोणीकंद व तलाठी तूळापूर, फुलगांव व वढु खुर्द, पुरवठा निरीक्षक तहसिल कार्यालय हवेली या विभागातील अधिकारी स्वत: हजर राहून शासनाच्या विविध योजनांची आवश्यक माहिती तसेच प्रलंबित कामे करून देण्यात येणार आहे.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

परिसरातील नागरिकांनी दि.१९/०७/२०२४ रोजी सायंकाळी ०६.०० वाजता तुळापुर येथील ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहून शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार ॲड. अशोक पवार यांनी परिसरातील नागरिकांना केले आहे

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page