गजानन गव्हाणे पाटील
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर भगव्या पताका, मुखी हरिनाम, विठ्ठल रुक्मिणीच्या वेशातील लहान – लहान मुले तसेच डोक्यांवर तुळशी वृंदावन घेतलेल्या मुली अशा भक्तिमय वातावरणात वढू खुर्द, ता. हवेली येथील अंगणवाडीच्या लहान – लहान मुलांनी आषाढी एकादशी निमित्त दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या पालखी सोहळ्यात विद्यार्थी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामस्थ यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.



या पालखी सोहळ्यात विठ्ठल रुक्मिणी, वारकरी, तुळशी वृंदावन घेतलेला मुली असे तब्बल ३० मुले सहभागी झाले होते. मदतनीस नंदिनी निळेकर, सुभाष पवळे, रामदास भंडारे यांनी भजन म्हटले तर अंगणवाडी सेविका आशा पातोंड यानी नियोजन केले होते. यावेळी सहभागी मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.





