- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणकोरेगाव भिमा येथील सनराईज विद्यालयात पालखी सोहळा उत्साहात साजरा

कोरेगाव भिमा येथील सनराईज विद्यालयात पालखी सोहळा उत्साहात साजरा

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
भगव्या पताका, मुखी हरिनाम, विठ्ठल रुक्मिणीच्या वेशातील लहान – लहान मुले तसेच डोक्यांवर तुळशी वृंदावन घेतलेल्या मुली अशा भक्तिमय वातावरणात कोरेगाव भीमा ता. शिरूर येथील सनराईज इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या पालखी सोहळ्यात विद्यार्थी व शिक्षक यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.


विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेमध्ये विविध उपक्रम राबवले जातात. सध्या देहू आळंदी ते पंढरपूर अशी संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज पालख्या पंढरपूरला पायी वारीच्या माध्यमातून पोहोचले आहेत. आषाढी एकादशी निमित्त सनराइज इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने गावामध्ये दिंडी व पालखीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा परिधान केली होती. हातामध्ये भगवे झेंडे तसेच पारंपारिक पद्धतीने वारकऱ्यांची वेशभूषा असलेल्या विद्यार्थ्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात कोरेगाव भीमा गावांमधून पायी वारी करत पालखीची मिरवणूक घेतली. यामध्ये सुमारे ६१५ विद्यार्थी सहभागी होते.


संचालक सचिन भंडारे, संजय अप्पा फडतरे, ज्ञानेश्वर भंडारे, मधुकर कंद, दत्ता फडतरे माजी यांच्या हस्ते पालखीची पूजा करण्यात आली.
या कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रतीक्षा लंघे -घुटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षिका शिल्पा मेस्त्री, निर्मला मुरकुटे, स्वप्नाली घावटे, शीतल ताठे, रोहिणी शिंदे, अश्विनी उन्हाळे, मनीषा वाघमारे, संगीता पारखे, सुवर्णा देशपांडे, तनुश्री नायक, मिलिंद गायकवाड, संजय पेंटुले, सेलमोकर अर्चना, फडतरे सागर, मायने आरती, कदम रोहिणी, तांदळे शितल, सोळसे जयश्री, सावंत पूजा, साठे विशाल, बोंडर राजश्री, ढमढेरे कल्याणी यांनी नियोजन केले.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

झाडे लावा झाडे जगवा, पाणी हेच जीवन, कापडी पिशवी घरोघरी पर्यावरणाचे रक्षण करी यासारखे शंभरहून अधिक फलक बनविण्यात आले होते .विठ्ठल मंदिरासमोर सर्व विद्यार्थी एकत्रित आले तेथे विद्यार्थ्यांनी रिंगण, पावली, अभंग यांचे सादरीकरण केले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page