
कोरेगाव भीमा : प्रतिनिधी
नुकत्याच पार पडलेल्या शिरूर तालुक्यातील धानोरे – दरेकरवाडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत श्री घनोबा शेतकरी सहकार पॅनलचे ज्ञानेश्वर बबनराव थेऊरकर यांची तर व्हा. चेअरमनपदी मोहन बबनराव कामठे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ऐ. आर. कुंभार व सचिव रुपेश शिलवंत यांनी काम पाहिले.
काही दिवसापूर्वी सोसायटीचे मतदान झाले त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत श्री घनोबा शेतकरी सहकार पॅनलने बारा जागांपैकी नऊ जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवून विरोधी पॅनलचा सुपडा साफ केला ही निवडणूक यशस्वी करण्यासाठी काही ज्येष्ठ मंडळी व तरुण कार्यकर्ते मोठ्या जिद्दीने कामाला लागले होते. त्यामुळे निवडणूक दोन्ही गटांनी मोठ्या प्रतिष्ठेची केली होती. निवडणूक यशस्वी करण्यासाठी माजी चेअरमन रामदास जवळकर, माजी सरपंच अशोक भोरडे, रामभाऊ ढमढेरे, रमेश ढमढेरे, चंद्रकांत भोसूरे, पोपट दरेकर, सूर्यकांत भोसुरे, गंगाराम कामठे, माजी सरपंच बाळासाहेब तनपुरे, तुकाराम दरेकर, शिवाजी ढमढेरे, ज्येष्ठ नेते भालचंद्र पानसरे, पंडित दरेकर आदींनी सहकार्य केले.
नवनिर्वाचित संचालक मंडळ पुढील प्रमाणे :- बापूसाहेब भोसुरे, तिरसिंग जवळकर, आशुतोष ढमढेरे, ऋषिकेश ढमढेरे, बाबुराव गायकवाड, चंद्रभागा तनपुरे, शालन दरेकर, दत्तात्रय चोरमले, सुभाष माशिरे, भानुदास भोसुरे, खंडू ढोले
निवडीनंतर नवनिर्वाचित चेअरमन व व्हा. चेअरमन यांचा ग्रामस्थांच्या वतीने फेटे बांधून नागरी सन्मान करण्यात आला. येणाऱ्या काळात शासनाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी विविध योजना तसेच शेती पिकासाठी अल्प दरात कर्जे उपलब्ध करून देणार असल्याचे यावेळी नवनिर्वाचित चेअरमन ज्ञानेश्वर थेऊरकर यांनी सांगितले.





