- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणकार्यकर्त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त घातला मुख्यमंत्री आणि उत्पादन शुल्क मंत्र्यांचा दुग्धाभिषेक

कार्यकर्त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त घातला मुख्यमंत्री आणि उत्पादन शुल्क मंत्र्यांचा दुग्धाभिषेक

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
केसनंद या.हवेली येथे युवासेना पुणे जिल्हाप्रमुख गणेश सातव पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उत्पादन शुल्क विभाग मंत्री शंभूराज देसाई यांचा दुग्धाभिषेक गणेश सातव पाटील मित्र परिवार व केसनंदचे सरपंच, प्रमुख व युवा सेना मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आला.


नुकत्याच पुण्यात झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरण तसेच ड्रग्स पार्टीवर कारवाई या दोन्ही घटनांवर ताबडतोब ॲक्शन घेऊन उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कारवाईचे आदेश देऊन अवैध धंदे मुळासकट उपटून टाकण्यासाठी व पुण्याची संस्कृती टिकून राहण्यासाठी केलेल्या कारवाईबद्दल त्यांचा दुग्धाभिषेक करण्यात आल्याचे गणेश सातव मित्र परिवाराच्या वतीने सांगण्यात आले.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

सदर दुग्ध अभिषेक बाजीराव दादा चव्हाण यांच्या मार्गदर्शना खाली युवा सेना जिल्हाप्रमुख गणेश जाधव पाटील व केसनंद गावचे सरपंच प्रमोद हरगुडे पाटील यांनी केला.
तमाम युवकांच्या व पुणेकरांच्या वतीने उत्पादन शुल्क विभाग मंत्री शंभूराज देसाई यांचे मनापासून अभिनंदन, शंभूराज देसाई यांच्या सारखा मंत्री उत्पादन शुल्क विभागाला लाभला त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे देखील कार्यकर्त्यांनी मनःपूर्वक आभार मानले

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page