कासूर्डी प्रतिनीधी : नवनाथ वेताळ
“पाऊले चालती पंढरीची वाट” या शब्दा प्रमाणे टाळ मृदुंगाच्या गजरात जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करत आहे. वारकऱ्यांसाठी शासनाने चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत तसेच प्रायव्हेट सेक्टर मध्ये देखील वारकऱ्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न होत असलेला दिसून येत आहे ,सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून मेडिकल फिल्ड मधील डॉक्टर,नर्सेस नॉन मेडिकल स्टाफ हे देखील वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी रस्त्यावरती उतरलेले आपणाला दिसत आहे.

श्री विठ्ठल दर्शनासाठी तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे जाणाऱ्या सर्व वारकऱ्यांना रामकृष्णा मल्टीस्पेशलिटी क्लिनीकच्या कोलवडी यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व गोळ्या-औषध वितरण सेवा गेले दोन दिवस देण्यात येत आहे तसेच वारकऱ्यांना वाटेत आरोग्याच्या काही अडचणी येऊ नये यासाठी गोळ्या, औषधांची किट प्रत्येक वारकऱ्यांना देण्यात आले.
रामकृष्ण मल्टी स्पेशलिटी क्लिनिक चे डॉ. हृषीकेश शरद गायकवाड हे कोलवडी येथे जनरल प्रॅक्टिस करत आहेत, त्यांच्या अनेक पिढ्यानो-पिढ्या वारकरी संप्रदायात कार्यरत आहेत तसेच तोच सामाजिक वारसा डॉक्टर ऋषिकेश गायकवाड हे पुढे चालू ठेवला आहे. ऋषिकेश गायकवाड यांनी सामाजिक बांधिलकी जपत व वारकऱ्यांच्या सेवेचा वारसा पुढे नेत ही सेवा दिली आहे.

वारकरी संप्रदाय विषयी असणारे अतूट नाते आणि पांडुरंगा वरती आणि भक्ती वरती असलेला विश्वास श्रद्धा या उपक्रमातून व्यक्त होताना आपणाला दिसून येत आहे. तसेच डॉक्टर ऋषिकेश गायकवाड यांनी यावेळेस सांगितले की गरीब लोकांसाठी तसेच वयस्कर वृद्धांसाठी त्यांच्याकडून उपचार मोफत करण्यात येतील आणि मोठ्या आजारांसाठी मोठ्या हॉस्पिटलमध्ये सवलतीच्या दारात सरकारी स्कीम मध्ये उपचार करून देण्यात येतील असे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
आगामी काळात डॉक्टर अनेक तज्ञ डॉक्टरांना सोबत घेऊन सवलतीच्या दारात पेशंटला कोलवडी गावांमध्ये चांगल्या सुविधा उपलब्ध होतील,यासाठी डे केअर सेंटर चालू करणार आहेत, तसेच अनेक लोको उपयोगी प्रकल्प व योजना सुद्धा ते राबवणार आहेत.





