- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणकासुर्डी फाटा येथे जयहिंद विद्यालयाचे विद्यार्थी, पोलीस पाटील, प्रशासकीय अधिकारी व ग्रामस्थांच्या...

कासुर्डी फाटा येथे जयहिंद विद्यालयाचे विद्यार्थी, पोलीस पाटील, प्रशासकीय अधिकारी व ग्रामस्थांच्या वतीने स्वागत

- Advertisement -spot_img

कासुर्डी प्रतिनीधी : नवनाथ वेताळ
टाळ मृदुंगाच्या गजरा मध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूर कडे निघाली असताना पुणे सोलापूर हायवे वरील कासुर्डी फाटा येथे जय हिंद विद्यालयातील शाळकरी मुलांनी पालखी मार्गावर रांगोळीच्या पायघड्या तसेच शिक्षणाचे महत्व, मुलांना शिक्षणासाठी प्रवृत्त करणारे फलक, मराठी शाळेचे महत्त्व, आरोग्याची काळजी तसेच वाहने चालवताना घ्यावयाची काळजी, स्वच्छ वारी निर्मळ वारी, साथीचे रोग, आपला परिसर आपण स्वच्छ ठेवूया, इत्यादींचे बोर्ड हातामध्ये घेऊन जनजागृतीचा संदेश दिला.


यावेळी बोलताना जय हिंद विद्यालयाचे मुख्याध्यापक जे. के. थोरात यांनी सांगितले की, विद्यालयामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना अजून चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत तसेच गरीब विद्यार्थ्यांना मदत आणि उत्तम दर्जाचे शिक्षण आम्ही विद्यालयामध्ये देत आहोत.


प्रसंगी जय हिंद विद्यालयातील शिक्षक वर्ग उपस्थित होता. त्यामध्ये जय हिंद विद्यालयाचे मुख्याध्यापक जेके थोरात, नाळे सर ,जगताप सर, शेंडगे सर ,शेवते सर ,कांचन सर, मेरगळ सर ,कारंडे सर , म्हेत्रे मॅडम, आखाडे मॅडम, कामटवाडी चे पोलीस पाटील ज्योती भिसे, सुभाष भिसे, कासूर्डी ग्रामसेवक देशमुख भाऊसाहेब, सागर सोनवणे, तानाजी गायकवाड, बाळासाहेब टेकवडे, काकासाहेब गायकवाड, उत्तम सोनवणे, बाबासाहेब चौंडकर, महेंद्र काका आखाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यालयातील विद्यार्थ्यांनी जनजागृती संदेश देणारे फलक हातात उंच धरून ग्रामस्थांना आणि वारकऱ्यांना चांगला संदेश देण्याचे मोलाचे काम केले. यावेळी बोलताना ज्योती सुभाष भिसे (पोलीस पाटील कामटवाडी) यांनी सांगितल्याप्रमाणे सर्वांनी जर कायद्याच्या नियमाचे पालन केले आणि विद्यार्थ्यांनी दिलेल्या संदेशाचे स्वतःच्या जीवनात आत्मसात केले तर कुठलीच अडचण कोणाला येणार नाही.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

विद्यार्थ्यांनी हातातील बोर्ड द्वारे दिलेल्या संदेशाचे पालन आणि स्वतःच्या जीवना मध्ये आत्मसात करण्याचे सर्व ग्रामस्थांनी ठरविले आहे, आणि विद्यालयातील विद्यार्थ्यांचे आणि शिक्षक वर्गाचे सर्वत्र कौतुक होत आहे. कासुर्डी ग्रामस्थांकडून जयहिंद विद्यालयातील शिक्षक वर्गांचे आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page