प्रतिनिधी : नवनाथ वेताळ
भक्तिमय वातावरणात लाखो वारकऱ्यांसह पुण्याहून निघालेल्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा ग्रामीण भागातील पहिला मुक्कामासाठी कदमवाकवस्ती येथील पालखी स्थळावर विसावला. मांजरी बुद्रुक येथील दुपारचा विसावा उरकून संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोल नाक्यावर सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पोहोचतात रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या हजारो नागरिकांनी टाळ्या वाजवून पालखीचे दर्शन घेतले तसेच वारकऱ्यांचे स्वागत केले.

यावेळी पालखी सोहळ्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर कटके, उपसरपंच नासिर खान पठाण, माजी सरपंच गौरी गायकवाड, माजी उपसरपंच देविदास कदम, ह भ प सुरेश महाराज काळभोर, हनुमंत काळभोर, नवपरिवर्तन फाउंडेशन चे अध्यक्ष चित्तरंजन नाना गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य आकाश काळभोर, कोमल काळभोर, बिना काळभोर, प्रीतम गायकवाड, राजश्री काळभोर, विशाल गुजर, ग्रामविकास अधिकारी अमोल घोळवे यांनी स्वागत केले.
यावेळी नागरिकांनी ज्ञानोबा-तुकाराम यांचा जयघोष केला. पालखी सह कदमवाक वस्ती व लोणी काळभोर येथील नागरिक टोलनाका परिसरातून ते पालखी तळा पर्यंत चालत देखील गेले तसेच अनेकांनी सेल्फी फोटो टिपले.
वाकवस्ती येथे पालखीचे साधना सहकारी बँकेचे संचालक सुभाष नरसिंग काळभोर, माजी उपसरपंच बाबाराजे काळभोर, देविदास काळभोर, ऋषिकेश काळभोर, गौरव काळभोर, मुकुल काळभोर व त्यांच्या सहकार्याने केले शुभेच्छांचा वर्षाव घेत पालखी सोहळा लोणी स्टेशन चौकात सात वाजण्याच्या सुमारास पोहोचताच पालखीचे स्वागत फाटाक्यांची आतिषबाजी करून मोठ्या उत्साहात करण्यात आले यावेळी भाविकांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती लोणी स्टेशन येथील छोटा विसावा संपून पालखी सोहळा मुक्कामासाठी कदमवाकवस्ती येथील पालखी तळावर संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पोहोचली यावेळी पालखी स्थळावर सार्वजनिक आरती व पूजा करण्यात आली.

दरम्यान लोणी काळभोर व कदमवाकवस्ती पंचक्रोशीतील नागरिकांनी वैष्णव भक्तांना स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था केली होती तर राजकीय व सामाजिक क्षेत्रातील नेते विविध संस्था व मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वारकऱ्यांसाठी चिवडा ,बिस्किट, फळे व फराळाचे पदार्थ वाटप केले पालखीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शिवम हॉस्पिटल तसेच विश्वराज हॉस्पिटल यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.





