गजानन गव्हाणे पाटील
ज्ञानोबा माऊली तुकाराम च्या जयघोषित कोरेगाव भीमा ता. शिरूर येथून शिरूर हवेली प्रासादिक दिंडीचे आज श्री क्षेत्र देहूकडे प्रस्थान करण्यात आले. यावेळी शेकडो वारकरी यामध्ये सहभागी झाले होते. यामध्ये युवक व महिलांची संख्या लक्षणीय होती हातात भगवे ध्वज व डोक्यावर तुळशी वृंदावन घेतल्याने भीमा नदीवरील पुलावर दिंडीचे रूप पाहण्यासारखे होते.


सालाबाद प्रमाणे याही वर्षी गावातील दत्त मंदिरात विना व तुळशीचे पूजन करत दिंडीचे प्रस्थान करण्यात आले. सन १९८८ साली शिरूर हवेली प्रसाद दिंडीला सुरुवात करण्यात आली. एक शिस्तबद्ध दिंडी म्हणून शिरूर हवेली दिंडीचे नाव आहे. यंदाच्या वर्षी श्रीक्षेत्र देहू ते पंढरपूर पायी दिंडीसाठी बाराशे पेक्षा जास्त वारकरी यामध्ये सक्रियपणे सहभागी झाले आहेत. कोरेगाव भीमा, लोणीकंद, वढू बुद्रुक, वढू खुर्द, डिंग्रजवाडी, आपटी अशा सहा गावांमधून लोक या दिंडीमध्ये सहभागी होत असतात.

यावेळी शिरूर हवेली दिंडीचे अध्यक्ष कांतीलाल फडतरे, उपाध्यक्ष विनायक गव्हाणे, दिंडी चालक ह. भ. प. हनुमंत शिवले, भाऊसाहेब गव्हाणे, दिनकर गव्हाणे, भाऊसाहेब ढेरंगे, विलास खांदवे, बाळासाहेब कंद, पोपट शिवले, राजेंद्र भंडारे, दिलीप ढेरंगे, विवेक ढेरंगे, केशव फडतरे, रमेश भंडलकर, अनिल कंद आदी यात सहभागी झाले होते.





