गजानन गव्हाणे पाटील
ज्ञानोबा माऊली तुकाराम च्या जयघोषात पेरणे बकोरी गावच्या संयुक्त श्री सिद्धेश्वर प्रासादिक दिंडीचे नुकतेच ग्राम प्रदक्षिणा घालत देहूकडे प्रस्थान झाले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सारिका हरगुडे, सरपंच उषा वाळके, दिंडीचे अध्यक्ष नामदेव वारघडे, उपाध्यक्ष व माजी उपसरपंच शिवाजी वाळके आदींचे हस्ते विना व विठ्ठल रुक्मिणी चे पूजन करण्यात आले.

गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मूर्तींना पुष्पहार अर्पण करून वाजत गाजत दिंडीचे ज्ञानोबा तुकाराम च्या जे घोषात प्रसन्न वातावरणात प्रस्थान करण्यात आले. यावेळी शेकडो वारकरी सहभागी झाले होते यामध्ये महिलांची संख्या ही लक्षणीय होती.
श्री सिद्धेश्वर प्रासादिक दिंडीचे मार्गावर असंख्य ठिकाणी स्वागत करण्यात आले तर काही ठिकाणी आलेल्या वारकऱ्यांसाठी अल्पोपहार व चहा नाश्त्याची सोय करण्यात आली असल्याची माहिती दिंडीचे उपाध्यक्ष व माजी उपसरपंच शिवाजी वाळके यांनी दिली.

यावेळी हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती माऊली वाळके, दिंडीचे उपाध्यक्ष शिवाजी वाळके, माजी चेअरमन दत्तात्रय वाळके, माजी उपसरपंच गणेश येवले, अक्षय वाळके, केसनंद चे माजी सरपंच मिलिंद हरगुडे, ग्रामपंचायत सदस्या माधुरी वाळके, पोलीस पाटील बबन वाळके, साईनाथ वाळके, उत्तमराव भोंडवे, दिंडीचे संचालक नागनाथ कदम, तुकाराम वाळके, गोरक्ष वाळके, कुंडलिक वारघडे सत्यवान वारघडे आदी प्रमुख व वारकरी यावेळी उपस्थित होते.
सिद्धेश्वर प्रासादिक दिंडीचे हे चौदावे वर्ष असून पेरणे व बकोरी येथील वारकऱ्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे.





