दात्यांनी दिलेल्या झाडांची विद्या विकास मंदिर आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी, ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थ यांच्या मदतीने केली यशस्वी लागवड
गजानन गव्हाणे पाटील
निमगाव म्हाळुंगी ग्रामपंचायत चे सरपंच बापूसाहेब काळे यांनी पुकारलेल्या १० हजार झाडे लावण्याच्या संकल्पनेला साद घालून झाडे दत्तक योजनेमध्ये अनेक वृक्षदत्तक दात्यांनी वृक्ष दत्तक दिले होते. त्या झाडांची निमगाव म्हाळुंगी येथील विद्या विकास मंदिर आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थांच्या मदतीने यशस्वी लागवड करण्यात आली.

या योजनेच्या शुभारंभ प्रसंगी श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी दिपक रोडे यांनी शाळेतील उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून सामूहिक वृक्षप्रतिज्ञा सादर करून वृक्ष लागवडीस सुरवात केली.
वृक्ष लागवडचा शुभारंभ शिरूर तालुक्याचे माजी आमदार श्री म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत (काका) पलांडे, पंचायत समिती सदस्य विजयदादा रणसिंग, हायटेक प्लास्ट चे विनोद राऊत, आर्ट ऑफ लिव्हिंग चे तुकाराम जावळे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये शिरूर तालुका गट विकास अधिकारी महेश डोके यांच्या शुभ हस्ते करण्यात आला .
यावेळी निमगाव म्हाळुंगी चे सरपंच बापूसाहेब काळे, विद्या विकास मंदिर चे प्राचार्य संजीव मांढरे, जि. प. शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब साकोरे, मारुती निकम, आर्ट ऑफ लिव्हिंगचे अजित रणसिंग, ग्रामविकास अधिकारी गुलाबराव नवले, कृषी अधिकारी जयश्री रासकर, तलाठी शांताराम सातपुते,धनंजय लांडगे,ग्रामपंचायत कर्मचारी, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठया प्रमाणावर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बापूसाहेब काळे, सूत्रसंचालन मुकुंद ढोकले यांनी तर विद्या विकास शाळेचे मुख्याध्यापक संजीव मांढरे सर यांनी आभार मानले.





