- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणगव्हाणे यांचे मुळे आरोग्य केंद्राचे नाव देशभर पोहचले : डॉ. नीलिमा इनामदार

गव्हाणे यांचे मुळे आरोग्य केंद्राचे नाव देशभर पोहचले : डॉ. नीलिमा इनामदार

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा तळागाळापर्यंतच्या रुग्णांना मिळाण्यासाठी सिस्टरचे योगदान महत्त्वाचे असून त्यांना मिळालेल्या राष्ट्रपती पुरस्कारामुळे आज पेरणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे नाव देशभर पसरले असे गौरोद्गार पेरणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलिमा इनामदार यांनी केले.

पेरणे, ता. हवेली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सहाय्यिका विमल पोपट गव्हाणे – दौंडकर यांच्या सेवा निवृत्ती कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
यावेळी पेरणे आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा घोरपडे, वाडेबोल्हाई आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी सचिन सूर्यवंशी, माजी आरोग्य सहाय्यक आण्णासाहेब कोकडे, माजी उपसरपंच रवी वाळके, माजी सरपंच राहुल गव्हाणे, आरोग्य सेवक सचिन बुगे, सुनील पडवळ, प्रशांत काकडे, आदित्य रहाटे, सामुदायिक आरोग्य अधिकारी विद्या वांझुळ, रागिणी भोसले, शैला फड, आरोग्य सेविका प्रमिला सोनवणे, आशा गायकवाड, आशा दळवी, कोमल आचार्य, सविता पवार, संगीता बिहाडे, ज्योती झटाले, क्लार्क प्रतिमा महाडिक, प्रयोग शाळा सहाय्यक परमेश्वर दगडखैर, निलेश खांदवे, औषध निर्माण अधिकारी धनंजय दीक्षित, माजी विस्ताराधिकारी रघुनाथ गव्हाणे, माजी उपसरपंच विजय पाटील गव्हाणे, बाळासाहेब गव्हाणे, माझे चेअरमन रोहिदास गव्हाणे आदी मान्यवर व आरोग्य केंद्रातील असंख्य कर्मचारी उपस्थित होते.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

यावेळी बोलताना विमल गव्हाणे यांनी आपण केलेल्या प्रदीर्घ ३९ वर्षांच्या कामाचा लेखा जोखा मांडताना अश्रू अनावर झाले होते.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page