गजानन गव्हाणे पाटील
स्वाभिमानी मराठा महासंघ अराजकीय पध्दतीने मराठा समाजाला एकत्र करून समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी काम करत आहे. मराठा समाजातील बेरोजगारी, मराठा आरक्षण, शेतकरी आत्महत्या हे प्रश्न घेवून देशातील मराठा समाजातील शेतकरी, विद्यार्थी, तरुण, महिला यांना संघटनेसोबत घेत आहे. याच धर्तीवर स्वाभिमानी मराठा महासंघाच्या महिला दक्षता आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष पदी नुकतीच शिवशंभू प्रिया जांभळे यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्ती पत्र स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक डॉ. कृषिराज टकले पाटील यांनी नुकतेच दिले.

निवडी प्रसंगी बोलताना शिवशंभू प्रिया जांभळे म्हणाल्या की, माझ्यावर जी जबाबदारी टाकण्यात आली ती पूर्ण क्षमतेने पूर्ण करण्यासाठी मी कटिबध्द असून संघटनेच्या माध्यमातून तळागाळातील महिलांना न्याय देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. तसेच राज्यातील प्रत्येक महिलेला आर्थिक दृष्ट्या स्वतः च्या पायावर उभे करण्यासाठी विविध प्रकारचे शासकीय योजना, शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी आपली लोकशाही शी बोलताना भावना व्यक्त केल्या.

जांभळे यांच्या निवडीचे स्वागत स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक डॉ. कृषिराज टकले पाटील, राष्ट्रीय अध्यक्ष मराठा रामनारायण, राष्ट्रीय उपाध्यक्ष निलेश धुमाळ पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस राजबीर सिंह, राष्ट्रीय चिटणीस सलील सुर्यवंशी, महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गौरव पवार, कार्याध्यक्ष दिपक दादा पवार, महिला आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष कोकीळा पवार, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा अनिता पाटील, प्रदेश कार्याध्यक्षा अमृता पठारे, प्रदेश उपाध्यक्षा मायाताई देशमुख, महिला आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्ष पदी सीता जाधव, युवा आघाडी प्रदेश अध्यक्ष अभिजित खैरे, प्रदेश कार्याध्यक्ष युवा आघाडी लखन घाडगे पाटील, प्रदेश उपाध्यक्ष रुपेश दळवी, पुणे जिल्हा अध्यक्ष देवदत्त पोखरकर, महिला आघाडीच्या पुणे जिल्हा अध्यक्षा अलका सोनवणे, ज्योती सातव, मिरा शिंदे, अश्विनी सावंत, वैशाली बहीरट, सविता थोरात, शेतकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुभाष गागरे पाटील आदिंनी केले आहे.






