काटेवाडी प्रतिनिधी : शंकर भिसे
येत्या २६ जून रोजी बारामती तालुक्यातील करंजेपूल (करंजे) येथे राजश्री शाहुमहाराज जयंती निमित्त लोकनियुक्त खासदार केसरी भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने आपली लोकशाही देण्यात आली. या शर्यतीसाठी बारामती लोकसभेच्या नवनिर्वाचित खासदार सुप्रिया सुळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

समालोचक सुनील मोरे तर झेंडा पंच राजेंद्र (बापू ) धनावडे काम पाहणार आहेत
स्पर्धेसाठी पारितोषिक वितरण पुढील प्रमाणे असणार आहे :-
पहिले पारितोषिक = १ लाख रुपये
दुसरे पारितोषिक = ७१ हजार रुपये
तृतीय पारितोषिक = ५१ हजार रुपये
चतुर्थ पारितोषिक = ३१ हजार रुपये
पाचवे पारितोषिक = २१ हजार रुपये
सहावे पारितोषिक = १५ हजार रुपये
सातवे पारितोषिक = ११ हजार रुपये
आठवे पारितोषिक = १० हजार रुपये असणार आहेत.

पारितोषिकसाठी सौजन्य : अमर मुलाणी (पठाण), अफसाना अमर मुलाणी (पठाण), प्रशांत बोरकर, प्रियंका शेंडकर, सतीश कदम, नाना गायकवाड, नवनाथ गायकवाड, राजेंद्र बापू जगताप, प्रदीप शेंडकर, राजाभाऊ गायकवाड, प्रवीण भोसले, बुवासाहेब हुंबरे, हनुमंत मगर, शेखर बाबुलाल पाटोळे, शिवकन्या वैभव गायकवाड, विनोद गायकवाड, किरण गायकवाड, आणि ढाल सौजन्य संभाजी (नाना) होळकर पाटील यांनी मोलाचे सहकार्य केलेले आहे.

तर बैलगाडा शर्यतीचे आयोजन शरदचंद्र पवार गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते, करंजे गावचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्य तसेच गावचे ग्रामस्थ यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते.





