- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणलोणीकंद,भावडी येथील गौण खनिज दगड खान व्यावसायिकांना महसुल विभागाचा दणका

लोणीकंद,भावडी येथील गौण खनिज दगड खान व्यावसायिकांना महसुल विभागाचा दणका

- Advertisement -spot_img

गौन खनिज तहसीलदार ज्योती देवरे यांच्याकडून लोणीकंद – भावडी हद्दीतील दगड खानींची ड्रोन द्वारे मोजणी सुरू
गजानन गव्हाणे पाटील
पुणे जिल्ह्याच्या पूर्व पट्ट्यातील वाघोली नजीकच्या लोणीकंद तसेच भावडी या दोन गावांमधील खान उद्योजकांचा वाढता धुमाकूळ, शासनाची फसवणूक होत असल्याने पंधरा दिवसापासून गौण खनिज दगड खाणींची मोजणी सुरू केल्याची माहिती गौन खनिज तहसीलदार ज्योती देवरे यांनी माध्यामांना दिली.

लोणीकंद व भावडी या दोन्ही गावांच्या परिसरामध्ये अनेकांचे दगड क्रेशर खाणींचे उद्योग आहेत, काही खाणींचा परवाना २२ जानेवारी २०२४ रोजी संपलेला असून कित्येक व्यावसायिक विनापरवाना चोरून खान चालवत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. त्याचप्रमाणे पूर्वीच्या परवानगी मध्ये अनेकांनी शासनाला भरलेल्या रॉयल्टीच्या कितीतरी अधिक पटीने उत्खनन केल्याचा प्रकार घडला असल्याने या बाबी शासनाच्या लक्षात आले आहेत.


शासनाच्या डोळ्यात माती टाकत तसेच शासनाची झालेली फसवणूक याला वाचा फोडण्यासाठी पुणे जिल्ह्याच्या कारवाई मध्ये धडाकेबाज म्हणून ओळख असणाऱ्या गौण खनिज तहसीलदार ज्योती देवरे यांनी बेधडकपणे, खान उद्योगांमध्ये झालेल्या उत्खननाची ड्रोन द्वारे पंधरा दिवसा पासून मोजणी चालू केल्याने, खान उद्योजकांचे धाबे दणाणले आहेत, तहसीलदार देवरे यांचे खान उद्योगाच्या ठिकाणी आगमन होताच खान उद्योजक, वाहतूकदार यांची पळापळ झाली, काही मिनिटातच वाहतूक करणाऱ्या गाड्या पूर्णपणे बंद झाल्याचे चित्र दिसून आले.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

पंधरा दिवसापासून लोणीकंद, भावडी, पुरंधर, शिरूर, मावळ, नऱ्हे आंबेगाव, फुरसुंगीसह पुणे परिसरात जवळपास ऐंशी ते नव्वद विनापरवाना गौन खनिज वाहतुक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page