
कोरेगाव भीमा/प्रतिनिधी
लोणीकंद, ता. हवेली येथील श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनीरिंगमध्ये यांत्रिकी आणि विद्युत अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्लेसमेंट ड्राईव्ह हा मेटामॉर्फोसिस एंजिटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एमईआयपीएल), सणसवाडी, पुणे या कंपनीसाठी घेण्यात आला होता. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे श्री रामचंद्र एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष मारुती भूमकर तसेच श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनीरिंगचे प्राचार्य प्रा. डॉ. अविनाश देसाई यांनी अभिनंदन केले.
या प्लेसमेंट ड्राईव्हसाठी यांत्रिकी अभियांत्रिकीचे सहाय्यक प्राध्यापक रोहित पिंगळे, प्रमोद वाळुंज आणि विद्युत अभियांत्रिकीचे सहाय्यक प्राध्यापक श्रद्धा अहिरराव व प्रदीप पालकर आणि इतर सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.
मुख्य संपादक : गजानन बाळासाहेब गव्हाणे UDYAM REG. NO. : MH-26-0242806





