गजानन गव्हाणे पाटील
आपल्या पतीचे आयुष्य वाढावे आणि सातो जन्मी आज जीवन साथी मीळावा या उद्देशाने आज कोरेगाव भीमा व परिसरातील शेकडो महिलांनी वडाच्या झाडाचे पूजन करत वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी महिलांनी पारंपारिक वेशात वडाच्या झाडाचे पूजन केले. मागील काही वर्षानपासून बेसुमार होत असलेल्या वृक्षतोडीमुळे महिलांना मिळेल त्या ठिकाणी जाऊन वडाचे पूजन करावे लागले. यावेळी महिला वर्गाने या पुढील काळात भावी पिढीला वडाच्या झाडाची कमतरता भासू नये यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ झाली असल्यामुळे ही अनेक ठिकाणी उष्माघाताचे प्रमाण वाढत आहे तसेच पावसाचे प्रमाण देखील कमी झाले आहे. यासाठी वृक्षारोपण करणे ही काळाची गरज असल्याचे मत कोरेगाव भिमा ग्रामपंचायतच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वंदना विजय गव्हाणे यांनी ” आपली लोकशाही ” शी बोलताना भावना व्यक्त केल्या.

सामूहिक वटपोर्णिमा साजरी करत असताना महिलांनी वडाचे पूजन करत असताना एकमेकींना हळदीकुंकू लावत एकमेकींचे औक्षण केले.





