गजानन गव्हाणे पाटील
जागतिक योगा दिनाच्या निमित्ताने माहेर च्या विविध शाखे सह वढू बुद्रुक येथील केंद्रात मुले, कर्मचारी आणि घरातील ग्रुहमातांसह जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला.

योग मुळे श्वासोच्छवासाची क्षमता, सामर्थ्य आणि शरीराची लवचिकता सुधारण्यास मदत होती असे मोलाचे मार्गदर्शन संस्थापिका व जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सि. लुसी कुरियन यांनी मुलांना सांगितले. तसेच माहेर मध्ये नित्य योगासने केली जातात आणि त्या मुळेच माहेर च्या मुलांमध्ये योगा विषयी विशेष आकर्षण आहॆ. याच निमित् योग स्पर्धा आयोजित केल्या आणि विजेत्या मुलांना उत्कृष्ट असने केल्या मुळे या कामगिरीबद्दल बक्षिसे देण्यात आली. यामुळे मुले ही आनंदी झाली.

यावेळी संस्थेच्या अध्यक्षा हिरा बेगम मुल्ला, आनंद सागर, प्रकाश कोठावळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर वावरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रसेनजीत गायकवाड यांनी केले.





