- Advertisement -spot_img
Homeशालेयबी जे एस मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

बी जे एस मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
वाघोली, ता. शिरूर येथील भारतीय जैन संघटना माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य संतोष भंडारी यांनी ” आपली लोकशाही ” स दिली.
यावेळी प्रा. राकेश वांजोळे यांनी योगा बाबत माहिती दिली. यामध्ये त्यांनी योगाची आठ अंगे सविस्तरपणे समजावून सांगितली. यानंतर योगासने व प्राणायाम यांचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आली. यावेळी प्रा. राणी कळमकर यांनी पतंजली ऋषींना वंदन करून योगा अभ्यासाची सुरुवात केली. विद्यार्थ्यांकडून काही योगासनाचे प्रकार व ओमकार, भ्रामरी, भास्रिका, अनुलोम विलोम, कपालभाती यासारखे प्राणायामाचे प्रकार घेतले व यानंतर ध्यान घेतले व शांती मंत्राने योगपाठाची सांगता केली.


योग अभ्यास करत असताना सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी स्वतः आसने व प्राणायाम करून उत्स्फूर्त सहभाग दर्शविला. यानंतर योगशिक्षक राणी कळमकर व क्रीडाशिक्षक राकेश वांजळे, सूर्यकांत दुधभाते यांचा सिंह मॅडम आणि उपप्राचार्य गेठे सर यांनी सन्मान केला. यानंतर सूर्यकांत दुधभाते सर यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य संतोष भंडारी, उपप्राचार्य गेठे सर सर्व शिक्षक व शिक्षिका यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राणी कळमकर यांनी केले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page