गजानन गव्हाणे पाटील
वढू बुद्रुक, ता. शिरूर येथील शरदचंद्रजी पवार विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अशी माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक एकनाथ चव्हाण यांनी दिली.


सदर प्रसंगी विद्यालयातील ज्येष्ठ क्रीडा शिक्षक शिवले सर, श्रीमती मोकाशी मॅडम, वनवे सर यांनी योग दिनाचे महत्त्व सांगून प्रात्यक्षिक सादर केले. त्याच्या अगोदर पूर्वतयारी म्हणून विद्यार्थ्यांकडून शारीरिक हालचालीचे व्यायाम करून घेतले व जवळपास दीड तास वेगळ्या प्रकारची योगासनाचे प्रकार विविध करून घेण्यात आले.
यावेळी शाळेतील जवळपास ५७२ विद्यार्थी १९ शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.





