गजानन गव्हाणे पाटील
निमगाव म्हाळुंगी येथील विद्या विकास मंदिराच्या प्रांगणात आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम मोठया उत्साहात साजरा करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे आयोजन निमगाव म्हाळुंगी ग्रामपंचायत, विद्या विकास मंदिर निमगाव म्हाळूंगी आणि आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमान करण्यात आलं होते.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्या विकास मंदिर हायस्कूल आणि जिल्हा परिषद शाळा निमगाव म्हाळुंगी या सर्व शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला होता. योग दिनाबद्दल आर्ट ऑफ लिव्हिंग चे मुख्य प्रक्षिक्षक तुकाराम जावळे, आणि निमगाव म्हाळुंगी चे सरपंच बापूसाहेब काळे यांनी उपस्थित सर्वांना योगदिनाबद्दल माहिती सांगून योगदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी आर्ट ऑफ लिविंग चे प्रशिक्षक तुकाराम जावळे आणि किशोर कोळेकर यांनी मुलांना योगाचे प्रात्यक्षिक करून दाखवले आणि विद्यार्थी यांच्या कडून प्रात्यक्षिक करून घेतले.
यावेळी निमगाव म्हाळुंगी चे सरपंच बापूसाहेब काळे, ग्रामविकास अधिकारी गुलाबराव नवले, विद्या विकास मंदिर शाळेचे मुख्याध्यापक संजीव मांढरे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब साकोरे, मारुती निकम, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. विराज भंडलकर, आशा वर्कर सुजाता चव्हाण, कामिनी नागवडे तसेच सर्व शाळेचे महिला शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या विकास शाळेचे मुख्याध्यापक संजीव मांढरे यांनी सूत्रसंचालन मुकुंद ढोकले यांनी तर योग दिवस उत्साहात साजरा होण्यासाठीचे मुख्य संयोजक निमगाव म्हाळुंगीचे सरपंच बापूसाहेब काळे यांनी सर्वजण योगा करण्यासाठी उपस्थित राहिल्या बद्दल उपस्थित सर्वांचे आभार मानले आणि सर्वांना योगदिनाच्या शुभेच्छा दिल्या.





