गजानन गव्हाणे पाटील
जागतिक योग दिनाच्या निमित्ताने कोरेगाव भीमा, ता. शिरूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत मोठ्या उत्साहात जागतिक योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी असंख्य विद्यार्थ्यांनी योगासने केली.

यावेळी विविध आसणे, योगासने, सूर्यनमस्कार अशाच प्रकारचे अनेक योगासने विद्यालयातील शिक्षक तुकाराम सातकर गणेश दाते यांनी विद्यार्थ्यांसमोर करून दाखवत विद्यार्थ्यांकडून करून घेतली.

शिक्षणाबरोबर आपले शरीर सुदृढ व आजार मुक्त होण्यासाठी योगासने ही काळाची गरज असल्याचे मत यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका उषा भंडारे यांनी बोलताना सांगितले.

योगासनानंतर मुलांना पोष्टिक आहाराचे वाटप देखील करण्यात आले





