गजानन गव्हाणे पाटील
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दर्जा वाढीबरोबर त्यांचे शरीर सुदृढ व तंदुरुस्त राहण्यासाठी दिवसातून किमान 20 मिनिटे योगा केल्यास आपण विविध प्रकारच्या आजारांपासून दूर राहू शकतो असे प्रतिपादन स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या कोरेगाव येथील छत्रपती संभाजी हायस्कूलच्या प्रभारी प्राचार्य वर्षा धर्मराज वाजे यांनी केले.

विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित योगासने उपक्रमात त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होत्या यावेळी विद्यालयातील शिक्षक संभाजी कोल्हे व सोमनाथ पिचड यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे योगासने करून दाखवत विद्यार्थ्यांकडून ती करून घेतली. यामध्ये विद्यार्थ्यांकडून काही योगासनाचे प्रकार व ओमकार, भ्रामरी, भास्रिका, अनुलोम विलोम, कपालभाती यासारखे प्राणायामाचे प्रकार घेतले व यानंतर ध्यान घेतले व शांती मंत्राने योगपाठाची सांगता केली.


योग अभ्यास करत असताना सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी स्वतः आसने व प्राणायाम करून उत्स्फूर्त सहभाग दर्शविला.





