गजानन गव्हाणे पाटील
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सणसवाडी येथे शाळा प्रवेशोत्सव व मोफत पाठ्यपुस्तक वाटप मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप व खाऊ वाटप करण्यात आला असल्याची माहिती मुख्याध्यापक सुरेश भंडारे यांनी दिली.


या कार्यक्रमाचे निमित्ताने कोरेगाव भिमा केंद्राचे केंद्रप्रमुख राजेंद्र टिळेकर, शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष रूपाली दरेकर, सदस्य दिनेश दरेकर, विक्रम दरेकर, ममता तडवी आणि बहुसंख्येने उपस्थित असा पालक वर्ग आणि सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.





