गजानन गव्हाणे पाटील
तब्बल चार वर्षांपासून फुलगाव ता. हवेली येथील डायना पॅक इंडिया प्रा. ली. कंपनीच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या सहकार्याने गावातील विविध भागात पावसाळ्याच्या सुरुवातीला वृक्षारोपण करण्यात येत आहे. या साठी कंपनीच्या बरोबरच ग्रामस्थ देखील वृक्षारोपण करून ती जगविण्यासाठी प्रयत्न करत असतात. यंदाचे वर्षी गावातील शनी मंदिराच्या परिसरात वृषरोपन करण्यात आले.


यावेळी बोलताना व्यवस्थापकीय संचालक अभिजित सोम यांनी विविध ठिकाणी काही ना काही कारणास्तव वृक्ष तोड करण्यात येते यावर चिंता व्यक्त करत. जमीन पुनर्संचयित करण्यासाठी व वाळवंटी करण रोखण्यासाठी वृक्ष लागवड करणे काळाची गरज आहे. यासाठी आमची जमीन – आमचे भविष्य या ध्येयानुसार मार्गक्रमण करण्याची घोषणा केली. तसेच उपस्थितांना वृक्ष संवर्धनाची शपथ देण्यात आली.
गावासाठी नेहमी सहकार्य करणाऱ्या डायनापॅक कंपनीचे आभार मानत आपली समाजाप्रती व निसर्गाच्याप्रती असलेल्या जबाबदारीमुळे वृक्षतोड न करता ती बांधावर, मोकळ्या जागेत वृक्ष लावावीत असे आवाहन सरपंच मंदानानी साकोरे यांनी केले.

याप्रसंगी माजी उपसरपंच राहुल वागस्कर, संध्या शिनगारे, राजेंद्र खुळे, माजी सरपंच सुनील वागस्कर, कांताराम वागस्कर, शाम कोळपकर, उद्योजक सागर खुळे, माजी चेअरमन दिलीप वागस्कर, डायनॅपॅक निती आनंद व्यवस्थापक एचआर तसेच अमोल जोशी, अल्फाज पटाइट, अमित देशपांडे, नितीश शिंदे, सौमित्र वाघोली कर, महेश ग्राम पुरोहित, राहुल मोरे, सुधीर चौधरी आदी यावेळी उपस्थित होते.





