गजानन गव्हाणे पाटील
चराचरातील प्रत्येक प्रसंग – घटना माणसाला काही ना काहीतरी शिकवत असते. त्यामुळे निसर्गाकडे चिकित्सक नजरेने पाहायला शिका. तुमच्यातली उत्सुकता जागृत ठेवा असे प्रतिपादन कोटकर एनर्जी डायनामिक्स प्रा. लि. चे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक अतुल कोटकर यांनी केले.
वढू बुद्रूक, ता. शिरूर येथील शरदचंद्रजी पवार विद्यालतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षाच्या स्वागत समारंभात ते बोलत होते.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ ची सुरुवात झाली त्या निमित्ताने शाळेत प्रवेशोत्सव आयोजित करण्यात आला. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना शासनाच्या वतीने मोफत पाठ्यपुस्तके पुरवली जातात त्या पुस्तकांचे वाटपही मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.

श्री. कोटकर पुढे म्हणाले की, रोटरी क्लब च्या माध्यमातून विद्यालयाला भविष्यात सहकार्य करण्याचे ही जाहीर केले. विद्यार्थ्यांच्या मध्ये कौशल्य विकसित व्हावीत गुणवत्ता वाढीस लागावी यासाठी विविध उपक्रम राबवण्याचे सुतोवाच केले.
या प्रसंगी लक्ष्मण भंडारे, हनुमान शिवले यांनीही आपली मनोगत व्यक्त केली.

श्री धर्मवीर शंभूराजे शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी संचालक यांचे सह वढू ग्रामपंचायतच्या विद्यमान उपसरपंच शिला भंडारे, माजी उपसरपंच अनिल शिवले, लालासाहेब तांबे, राहुल कुंभार सोसायटीचे माजी चेअरमन कांताराम अरगडे व इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज भंडारे, प्रास्ताविक मुख्याध्यापक एकनाथ चव्हाण यांनी तर विलास सुरकुटे यांनी आभार मानले.





