- Advertisement -spot_img
Homeशालेयजिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत पहिलीच्या विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत पहिलीच्या विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

- Advertisement -spot_img

शाळेतील मागण्यासाठी पाठपुरावा करत त्या लवकरच पूर्ण करणार : सरपंच संदीप ढेरंगे
गजानन गव्हाणे पाटील
शाळेसाठी भौतिक – शैक्षणिक सुविधा पुरवणे ही ग्रामस्थ – ग्रामपंचायत ची जबाबदारी असताना पालकांनी देखील “आपली शाळा” समजून पुढे येऊन शाळेसाठी सहकार्य करावे असे आवाहन कोरेगाव भिमाचे नवनिर्वाचित सरपंच संदीप ढेरंगे यांनी केले.

कोरेगाव भीमा ता. शिरूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत आयोजित पहिलीच्या विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाच्या निमित्ताने सरपंच बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुनीता गव्हाणे या होत्या.

यावेळी बोलताना संदीप ढेरंगे यांनी शाळेला भेडसावणाऱ्या विविध समस्यांची माहिती घेऊन त्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. यामध्ये मुख्यतः शाळेच्या वर्ग खोल्या, शैक्षणिक टॅबलेट मधील सॉफ्टवेअर, खेळाचे मैदान आदी प्रश्नांवर पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


यावेळी केंद्र प्रमुख राजेंद्र टिळेकर, मुख्याध्यापिका उषा भंडारे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष गणेश गव्हाणे, शिक्षणतज्ञ गजानन गव्हाणे पाटील, सदस्य सागर घावटे, पूनम लांडगे, सारिका भांडवलकर, ग्रामपंचायत सदस्या वंदना गव्हाणे, रेखा ढेरंगे, माजी शिक्षण तज्ञ सुनील भांडवलकर आदी मान्यवर विद्यार्थी शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तत्पूर्वी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांनी गावातून प्रभात फेरी काढत ” स्कूल चले हम “, ” माझी शाळा आदर्श शाळा ” अशा घोषणा देत प्रभात फेरी काढली. विद्यालय आयोजित कार्यक्रमात सरपंच, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका उषा भंडारे, शाळा व्यवस्थापन समिती यांच्या हस्ते सरस्वती व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
पालक विद्यार्थ्यांचे स्वागत करत प्रत्येकाचा दिवस असतो तो आज या विद्यार्थ्यांचा असून या विद्यार्थ्यांच्या जीवनाचा पाया रचला जाणार आहे. आत्तापर्यंत या विद्यालयातून असंख्य विद्यार्थी शिष्यवृत्ती नवोदय तसेच विविध परीक्षांमध्ये खेळांमध्ये चमकले असून ही गावासाठी व विद्यालयासाठी अभिमानास्पद बाब असून शाळेने यापुढील काळातही अशीच उज्वल परंपरा कायम राखावी असे यावेळी केंद्रप्रमुख राजेंद्र टिळेकर यांनी सांगितले.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

पाहुण्यांचे स्वागत जयमाला मिडगुले यांनी, सूत्रसंचालन सुरेश सातपुते यांनी शिक्षक मनोगत तुकाराम सातकर यांनी तर आभार विद्यालयाच्या मुख्याध्यापिका उषा भंडारे यांनी मानले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page