गजानन गव्हाणे पाटील
बुर्केगाव, ता. हवेली येथे माजी सरपंच नितीन आप्पा बाजारे युवा मंचच्या माध्यमातून यंदाच्या वर्षी दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व करिअर मार्गदर्शन मेळावा नुकताच संपन्न झाला. यावेळी १० वी, १२ वी उत्तीर्ण अशा ६५ विद्यार्थींचा सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच रुपाली थोरात होत्या.


यावेळी बुर्केगावातील उच्च शिक्षित तरुण विश्वास बाजारे, जिवन गायकवाड, भाऊसाहेब ठोंबरे, प्रिती दाभाडे, संदीप पवळे, किरण बाजारे, साईनाथ दाभाडे, अनुजा बाजारे, प्रसाद दाभाडे, योगेश थोरात, नवनाथ दाभाडे या मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थी, पालक व मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे नियोजन सुरेश ठोंबरे, सोमनाथ गुंड, समीर बाजारे यांनी केले.

भिकाजी काळे यांनी सुत्रसंचालन केले तर सिताराम सोनवणे यांनी आभार मानले.





