गजानन गव्हाणे पाटील
शिरूर हवेली प्रासादिक दिंडीच्या अध्यक्षपदी कोरेगाव भिमाचे माजी उपसरपंच कांतीलाल सयाजी फडतरे यांची तर उपाध्यक्षपदी विनायक राजाराम गव्हाणे यांची निवड करण्यात आली.

दिंडीचे विद्यमान अध्यक्ष भाऊसाहेब बापुराव गव्हाणे व उपाध्यक्ष ह.भ.प हनुमंत बबनराव शिवले यांचा कार्यकाल संपल्याने संस्थेच्या कोरेगाव भीमा येथील कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये फडतरे व गव्हाणे यांची एकमताने निवड करण्यात आली.

सन १९८७ साली दिंडीची स्थापना झाली असून यामध्ये कोरेगाव भिमा, डिंग्रजवाडी, लोणीकंद, वढू बुद्रुक, वढू खुर्द,आपटी या सहा गावांचा समावेश आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये रथामागे २३ क्रमांक असणारी शिरूर हवेली प्रसादिक दिंडी सोहळ्यात मोठी दिंडी समजली जाते. पंढरपूर येथे संस्थेची सात गुंठे जागा व त्यावर तीन मजली इमारत आहे. त्याचप्रमाणे संस्थेचे कोरेगाव भीमा येथे कार्यालय सुद्धा आहे.

निवडीवेळी संचालक भाऊसाहेब गव्हाणे, हनुमंतराव शिवले, बाळासाहेब कंद, विलासराव खांदवे, पोपट शिवले, दिलीप ढेरंगे, राजेंद्र भंडारे, सचिव विवेक ढेरंगे, सहसचिव केशव फडतरे त्याचप्रमाणे दिंडीचे नूतन सभासद व वारकरी उपस्थित होते.





