- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणनिवंगण येथे बिबट्याने केला पाळीव जनावरांवर हल्ला

निवंगण येथे बिबट्याने केला पाळीव जनावरांवर हल्ला

- Advertisement -spot_img

भोर प्रतिनिधी : दिपक पारठे
भोर तालुक्यातील निरा देवघर धरणाच्या रिंग रोड मार्गावरील मौजे निवंगण अलका लक्ष्मण डोईफोडे यांच्या घरामध्ये बिबट्या घुसून लहान मुले व वयोवृद्ध आजी झोपलेल्या असताना त्यांच्या बिछान्यावरून बिबट्याने घरात प्रवेश केला व पाळीव जनावरांवर हल्ला केला. सुदैवाने यामध्ये कोणतेही जनावर दगावले नाही परंतु जखमी झाले आहेत.


सदरील माहिती अलका डोईफोडे यांनी निवंगण गावचे सरपंच राजू दिघे तसेच माजी सरपंच किसन दिघे यांना दिल्यानंतर यांनी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहणी केली व सदर घडलेली घटना वन विभागाला कळविली.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

अशा प्रकारच्या घटना वारंवार या भागात घडत असतात तरी वन विभागाने त्वरित बिबट्याचा बंदोबस्त करावा व अलका डोईफोडे यांच्या पाळीव जनावरांवर झालेल्या हल्ल्याची पाहणी व चौकशी करून त्वरित नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page