- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणशिरूर लोकसभा निवडणूक मतमोजणीकरिता प्रशासन सज्ज ; रांजणगाव एमआयडीसी येथे होणार मतमोजणी

शिरूर लोकसभा निवडणूक मतमोजणीकरिता प्रशासन सज्ज ; रांजणगाव एमआयडीसी येथे होणार मतमोजणी

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
देशातील सर्व जागांवर लोकसभा निवडणूक पार पडली असल्याने ४ जून रोजी सर्वच ठिकाणी मतमोजणी केली जाणार आहे. शिरूर लोकसभा मतदार संघासाठी १३ मे रोजी मतदान पार पडले असून मतमोजणी ४ जून रोजी रांजणगाव एमआयडीसी (कारेगाव) येथील राज्य वखार महामंडळाच्या गोडाऊन येथे होणार आहे. मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.
सकाळी ईव्हीएम यंत्रे आणि टपाली मतपेट्या ठेवलेल्या सुरक्षा कक्षांचे (स्ट्राँग रुम) सील निवडणूक निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी आदी तसेच उमेदवार आणि उमेदवारांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत काढल्यानंतर आवश्यक ती प्रक्रिया करुन मतमोजणीला प्रारंभ केला जाईल. प्रारंभी सकाळी ८ वाजता टपाली मतदान आणि ईटीपीबीएस मतांची मोजणी सुरू होईल.
ईव्हीएमच्या मतमोजणीची सुरूवात ८ वाजून ३० मिनिटांनी होईल. मतमोजणी कक्षातील सर्व कामकाजाचे सीसीटीव्हीद्वारे संपूर्ण रेकॉर्डिंग करण्यात येणार असून याशिवाय व्हिडीओ कॅमेराद्वारेही चित्रीकरण करण्यात येणार आहे.
निवडणूकीच्या मतमोजणीची फेरीनिहाय आकडेवारी मतमोजणी केंद्राच्या ठिकाणाहून ध्वनीक्षेपकाद्वारे वेळोवेळी घोषित केली जाईल. मतमोजणी केंद्रामध्ये उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी तसेच मतमोजणी प्रतिनिधी यांना मोबाईल सोबत बाळगण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. वैध ओळखपत्र नसलेल्या कुठल्याही अनधिकृत व्यक्तीला मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार नाही.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

शिरुर लोकसभा मतदार संघातील जुन्नर मतदारसंघासाठी १४ टेबल व २५ फेऱ्या, आंबेगाव १४ टेबल व २४ फेऱ्या, खेड-आळंदी १६ टेबल व २४ फेऱ्या, शिरुर १६ टेबल व २७ फेऱ्या, भोसरी २० टेबल व २३ फेऱ्या तर हडपसर विधानसभा मतदार संघासाठी २० टेबल व २६ फेऱ्या होतील. पोस्टल व ईटीपीबीएस मतमोजणीसाठी १२ टेबल लावण्यात येणार आहेत. शिरुरसाठी १६२ मतमोजणी सहायक, १५२ मतमोजणी पर्यवेक्षक आणि १६६ सूक्ष्म निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.
शिरुर लोकसभा मतदार संघासाठी मतमोजणी निरीक्षक (काउंटिंग ऑब्झर्व्हर) म्हणून मोईनुद्दीन खान यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page