गजानन गव्हाणे पाटील
बुर्केगाव (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुनिल लक्ष्मण ठोंबरे यांची बिनविरोध निवड झाली. रिक्त झालेल्या पदासाठी सुनिल ठोंबरे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी मिलींद महाले यांनी ही निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर केले. सरपंच रूपाली थोरात, ग्रा. सदस्य व आज माजी पदाधिकारी तसेच ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली.
यावेळी माजी उपसरपंच रोहिणी बाजारे, उपसरपंच छाया जांभळकर, सदस्य किरण सोनवणे, अजित ठोंबरे, सुनील ठोंबरे, सारिका गजरे तसेच माजी सरपंच संतोष पवळे, आमदार सुनील कांबळे यांचे स्वीय सहाय्यक एकनाथ बाजारे, वि.का.सोसायटीचे चेअरमन सीताराम ठोंबरे, पप्पूशेठ थोरात, दिनाभाऊ जांभळकर, माऊली ठोंबरे, बबन ठोंबरे, राजेंद्र बाजारे, नितीन यनभर, दिपक यनभर, गणेश आबुराव बाजारे, अर्जुन ठोंबरे, भाऊसाहेब भोरडे, कृष्णा जांभळकर, साळभाऊ ठोंबरे, मारुती दाभाडे, रामदास ठोंबरे, दिनकर थोरात, काशिनाथ कोकरे, विलास ठोंबरे, दशरथ यनभर, बाळासाहेब काळे, दिपक रायकर, दिनकर शिंगटे, उमेश जांभळकर, बापू कोकरे, विनायक थोरात, धोंडीबा थोरात, विशाल ठोंबरे, दत्ता ठोंबरे, दिनेश बाजारे,दशरथ दाभाडे.एकनाथ थोरात,अण्णा थोरात, बजरंग ठोंबरे, मारुती (दादा) यनभर यांच्या सह उपस्थित ग्रामस्थांनी नवनिर्वाचित उपसरपंच सुनिल ठोंबरे यांचा शाल, श्रीफळ देऊन पुष्पहार घालून सत्कार करून अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

तर गावात जलजीवनच्या माध्यमातून पिण्याचे शुद्ध पाणी, कचरा व्यवस्थापन, तसेच गावच्या वस्त्यांवर चांगले व दर्जेदार रस्ते बांधण्यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून प्रयत्न करणार तसेच राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्व देणार असल्याचे नवनिर्वाचित उपसरपंच सुनिल ठोंबरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.





