- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणपेरणेच्या राधाकृष्ण विद्यालयाचा दहावी निकाल ९४.११ टक्के

पेरणेच्या राधाकृष्ण विद्यालयाचा दहावी निकाल ९४.११ टक्के

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
हवेली तालुक्यातील पेरणे येथील जनता शिक्षण संस्थेच्या राधाकृष्ण विद्यालयाचा इयत्ता दहावी मार्च २०२४ चा शेकडा निकाल ९४.११ टक्के लागला असल्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब जाधव यांनी आपली लोकशाही स दिली. दहावीच्या परीक्षेत विद्यालयाने घवघवीत यश संपादन केल्याने विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत असून पहिल्या तिन्ही क्रमांकावर मुलींनी बाजी मारल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
प्रशालेचे प्रथम तीन क्रमांक –
प्रथम क्रमांक :- जाधव धनश्री विलास (८३.४०% टक्के)
द्वितीय क्रमांक :- प्रांजल संदीप वाळके (७९.२०% टक्के)
तृतीय क्रमांक :- गौरी नितीन गायकवाड (७८.२०% टक्के)

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे प्रशालेच्या वतीने मुख्याध्यापक बाळासाहेब जाधव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व माजी उपसरपंच शिवाजी वाळके, अध्यापक पंढरीनाथ आवारी, कानिफनाथ पवार, वैभव भोरडे, शुभांगी गिरमकर, ज्येष्ठ लिपिक सुरेश वैरागे व ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page