गजानन गव्हाणे पाटील
सणसवाडी, ता. शिरुर येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल ९९.१३% टक्के निकाल लागला असून विद्यालयाने उज्वल निकालाची परंपरा कायम ठेवली आहे असल्याचे विद्यालयाच्या प्राचार्या राधिका मेंगवडे यांनी आपली लोकशाही शी बोलताना सांगितले.
प्रथम पाच क्रमांक
1️⃣ भाग्यश्री योगेश काळे ९८.२० % टक्के
2️⃣ आदिती अशोक भंडारे ९६.६० % टक्के
3️⃣ स्नेहल लिंबराज मातोळे ९५.०० % टक्के
4️⃣ अपेक्षा जगन्नाथ गव्हाणे ९४.८०% टक्के
5️⃣ धनश्री संतोष घुले ९१.२०% टक्के
सर्व विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, पर्यवेक्षक व सर्व शिक्षकांनी मार्गदर्शन केले

सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष आनंदराव संताजी हरगुडे, सचिव बाबासाहेब नामदेव साठे व सर्व सभासद, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य, पालक शिक्षक संघ अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य, ग्रा.पं.सणसवाडी सरपंच रूपाली दरेकर, उपसरपंच राजेंद्र दरेकर व सर्व सदस्य यांच्या वतीने व सणसवाडी ग्रामस्थांच्या वतीने तसेच प्रशालेच्या प्राचार्या राधिका मेंगवडे व पर्यवेक्षक देवकर जी.डी. यांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.





