- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणश्री छत्रपती संभाजी हायस्कूल चा ९३ टक्के निकाल; यशाची परंपरा कायम

श्री छत्रपती संभाजी हायस्कूल चा ९३ टक्के निकाल; यशाची परंपरा कायम

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर च्या श्री छत्रपती संभाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कोरेगाव भिमा, ता. शिरूर येथील १० वी एस. एस. सी परीक्षा २०२३-२०२४ चा निकाल ९३.०६% टक्के लागला असल्याची माहिती विद्यालयाच्या नवनिर्वाचित प्राचार्य वर्षा धर्मराज वाजे यांनी आपली लोकशाही शी बोलताना सांगितले. या घवघवीत यशाबद्दल विद्यार्थ्यांचे विविध स्तरावर अभिनंदन होत आहे.
प्रथम पाच क्रमांकाचे मानकरी
१) शंभूराज संतोष बारवकर ९१.४०% टक्के
२) सुरज पांडुरंग राऊत ८८.८०% टक्के
३) सुजित सुदाम हाडबे ८८.००% टक्के
३) अनुराधा मारुती साखरे ८८.००% टक्के
४) शिवराज जयप्रकाश ठाकूर ८७.००% टक्के
५) ऋषिकेश चंद्रशेखर भालेराव ८५.६० % टक्के

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिव शुभांगी गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, सहसचिव (प्रशासन) प्राचार्य डॉ. शेजवळ आर. व्ही., सहसचिव (अर्थ) प्राचार्य गवळी एस. एम., विद्या समिती अध्यक्ष श्रीराम शरदचंद्र साळुंखे, विद्यासमिती सचिव सुळगेकर ए. बी. यांच्यासह मुख्याध्यापक, पुणे विभागीय सदस्य, सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य कोरेगाव भिमा, चेअरमन, व्हाईस चेअरमन व विविध कार्यकारी सोसायटी कोरेगाव भिमा सदस्य, अध्यक्ष व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती, पालक-शिक्षक संघ, माता ते-पालक संघ, शिक्षक शिक्षिका, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page