- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणराहूल शिंदे यांची लोणीकंद गावच्या प्रभारी सरपंचपदी निवड

राहूल शिंदे यांची लोणीकंद गावच्या प्रभारी सरपंचपदी निवड

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
हवेली तालुक्यातील लोणीकंद ग्रामपंचायतच्या प्रभारी सरपंचपदी नुकतीच राहूल बाबासाहेब शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विद्यमान सरपंच प्रियंका झुरुंगे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी यावेळी राहूल शिंदे यांची प्रभारी सरपंचपदी निवड झाली असल्याचे ग्रामसेवक बोरावणे यांनी जाहीर केले. अध्यक्षस्थानी विघमान सरपंच प्रियंका झुरुंगे ह्या होत्या.


यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीपदादा कंद, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती नारायणराव कंद, जनार्धन वाळूंज, उपसभापती रविंद्र कंद, श्रीकांत कंद, गजानन कंद, सुनिल शिंदे, रामदास कंद, दिगंबर कंद, शहाजी शिंदे, यांच्यासह आजी माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक बोरावणे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रदीपदादा कंद व ग्रामस्थांच्या वतीने राहूल शिंदे यांचा शाल, पुष्पहार घालून अभिनंदन करण्यात आले.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

तर गावात जलजीवनच्या माध्यमातून पिण्याचे शुद्ध पाणी, कचरा व्यवस्थापन, तसेच गावच्या वस्त्यांवर चांगले व दर्जेदार रस्ते बांधण्यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून प्रयत्न करणार तसेच राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्व देणार असल्याचे नवनिर्वाचित प्रभारी सरपंच राहूल शिंदे यांनी “आपली लोकशाही” शी बोलताना सांगितले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page