- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणकोरेगाव भिमा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संदीप ढेरंगे यांची बहुमताने निवड

कोरेगाव भिमा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संदीप ढेरंगे यांची बहुमताने निवड

- Advertisement -spot_img

संदीप ढेरंगे यांना १० मते ते केशव फडतरे यांना ७ मते
गजानन गव्हाणे पाटील
शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचा विक्रम गव्हाणे यांनी राजीनामा दिल्याने सदर पद रिक्त झाले होते. यावेळी झालेल्या निवडणुकीत सरपंच पदी संदीप कचरूदास ढेरंगे यांची बहुमताने निवड झाली.


कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीच्या झालेल्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्य सरपंच संदीप ढेरंगे यांना १० व ग्रामपंचायत सदस्य केशव फडतरे यांना ७ मते मिळाली. यावेळी संदीप ढेरंगे यांना बहुमत मिळाल्याने सरपंचपदी निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी विकास फुके यांनी सांगितले. यावेळी सरपंच विक्रम गव्हाणे ग्रामविकास अधिकारी रतन दवणे उपस्थित होते.
सरपंच पदी संदीप ढेरंगे यांची निवड झाली. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य पंढरीनाथ गव्हाणे, अण्णासाहेब मगर बँकेचे संचालक राजाराम ढेरंगे, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक कैलास सोनवणे, माजी सरपंच व उद्योजक विजय गव्हाणे, माजी अध्यक्ष पंडित ढेरंगे, माजी चेअरमन बबुशा ढेरंगे, ग्रामपंचायत सदस्य महेश ढेरंगे ,शरद ढेरंगे, वंदना गव्हाणे, जयश्री गव्हाणे, रेखा ढेरंगे, कोमल खलसे, स्वराज्य राष्ट्र निर्माण सेनेचे राजेश सिंह ढेरंगे, उद्योजक अफजल तांबोळी, भाऊसाहेब ढेरंगे, उपस्थित होते.
या निवडणुकीसाठी शिक्रापूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, संदीप कारंडे, पोलीस पाटील मालन गव्हाणे उपस्थित होते.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

यावेळी पंचायत समिती सदस्य पि के गव्हाणे यांनी सरपंच हा गावाचा झाला असल्याने सर्वसमावेशक व सर्व समाज घटकांना न्याय मिळेल असे काम करावे तसेच गावातील सर्वसामान्य जनतेची कामे व्हायला हवीत विकासाला प्राधान्य देत गावाचा विकास करायला हवा असे आवाहन करत शुभेच्छा दिल्या. तर कैलास सोनवणे यांनी ” गावाचा विकास हाच ध्यास” या ध्येयातून कोरेगाव भिमाचे आदर्श विकासाचे मॉडेल तयार करायचे आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येत काम करायला हवे.
कोरेगाव भिमा येथील पाणी योजनेचे तातडीने काम पूर्ण करण्यासह गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवणे व भीमा नदीच्या पाण्याच्या शुध्दतेसाठी तसेच गावातील शेवटच्या घटकापर्यंत विकास कामे पोचण्यासाठी व त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. :- नवनिर्वाचित सरपंच संदीप ढेरंगे

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page