गजानन गव्हाणे पाटील
वाघोली मध्ये अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी महामार्गावर पाणी साचले होते. त्यामुळे वाहतुकीवर याचा परिणाम होत असल्याने अखेरीस वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी स्वतः महामार्गावर साचलेले पाणी काढून देत महामार्ग वाहतुकीसाठी खुला केल्याचे पाहायला मिळाले.
पुणे नगर महामार्गावरती वाघोली मध्ये अनेक ठिकाणी पावसाळ्यामध्ये पाणी साचत असते. त्यामुळे वाहतुकीवर याचा परिणाम होत असतो. पाणी साचल्यामुळे वाहतूक संत गतीने चालत असल्याने वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होते. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असतो. आता देखील झालेल्या पावसामुळे महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचले आहे हे पाणी काढून देण्याची जबाबदारी प्रामुख्याने पुणे महानगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग यांची आहे.

परंतु यांचे याकडे दुर्लक्ष असल्याने या साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे अखेरीस वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी स्वतः पुढाकार घेत महामार्गावर साचलेले पाणी काढून देत महामार्ग मोकळा केल्याचे पाहायला मिळाले.





