गजानन गव्हाणे पाटील
हवेली तालुक्यातील अग्रगण्य असलेल्या हनुमंतराव चौधरी काळभैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या व्हाईस चेअरमन पदी नुकतीच कोरेगाव भीमा तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष तथा उद्योजक दिनकरराव ज्ञानोबा गव्हाणे पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पतसंस्थेच्या विद्यमान चेअरमन पुनम सागर चौधरी या होत्या.

यावेळी संस्थेचे मावळते व्हा. चेअरमन ज्ञानेश्वर जवळकर, विद्यमान संचालक अविनाश जगताप, सागर चौधरी, जयवंत चौधरी, पांडुरंग खेडेकर, विठ्ठल चौधरी, अमोल चौधरी, तानाजी चौधरी, शिवाजी केसकर, संचालिका रेशमा चौधरी, तज्ञ संचालक गोरख चौधरी, सल्लागार संचालक संभाजी वाळके, रघुनाथ चौधरी, नितीन गव्हाणे, केशव चौधरी, मुख्यव्यवस्थापक अनिल जवळकर आदी यावेळी उपस्थित होते.

निवडीनंतर नवनिर्वाचित व्हा. चेअरमन दिनकरराव गव्हाणे पाटील यांनी सांगितले की, संस्थेच्या सध्या दोन शाखा असून सभासद संख्या दोन हजार पेक्षा अधिक आहे. ग्रामीण भागातील छोटे छोटे उद्योजकांना कर्ज उपलब्ध करून देऊन त्यातून त्यांची प्रगती करण्याचा आमचा हेतू असून मागील ३० वर्षांपासून संस्था ग्रामीण भागात आपलं नाव राखून आहे. तसेच संस्थेला सतत ऑडिट वर्ग अ मिळत असून एनपीए १००% तरतूद केल्याचे त्यांनी यावेळी “आपली लोकशाही” शी बोलताना सांगितले.
संस्थेत सद्या २३ कोटी रुपयांच्या ठेवी असून विविध प्रकारची सुमारे १७ कोटी रुपयांची कर्जे वाटप करण्यात आली आहेत.
दिनकर गव्हाणे पाटील यांच्या निवडीबद्दल पतसंस्थेचे सभासद, खातेदार, हितचिंतक तसेच कर्मचारी सिताराम बनकर, नंदा माने, ज्योती जमादार, रत्नकर बनसोडे, विठ्ठल पवार, नीलिमा चावर, महेश खंडागळे यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.





