गजानन गव्हाणे पाटील
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांची तारखेनुसार ३६७ वि जयंती शंभूराजे चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने श्री क्षेत्र तुळापूर येथील समाधी स्थळावर साजरी करण्यात आली.
यावेळी शंभूराजे चॅरिटेबल ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष शिवाजी बबन शिवले, माजी सरपंच ज्ञानोबा तुकाराम शिवले, उपाध्यक्ष नवनाथ किसन शिवले, संजय (आबा) शिवले, मारुती शिवले, माजी उपसरपंच पवन खैरे, राजाराम किसन शिवले, राजू चंद्रकांत शिवले, आप्पासाहेब जगताप, हनुमंत शिवले, पांडुरंग शिवले, सुनील राऊत, कुमार शिवले यांसह शंभूभक्त उपस्थित होते.

धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांची तारखेनुसार चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने महाराजांची जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी शंभू भक्तांच्या वतीने समाधीस्थळावर कसलाही गाजावाजा न करता शांततेत समाधीस्थळाला आकर्षक फुलांची सजावट करत, अभिषेक व पूजा करत महाराजांची जयंती साजरी करण्यात आली.





